Ahmednagar News : फेसबुक लाईव्ह करत भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांना घरात घुसून मारण्याची धमकी !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News  : अहमदनगर जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराने फेसबुक लाईव्ह करत भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या सागर गवसणे याने सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला असून,

तोही व्हायरल झाला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, धमकी देणाऱ्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

जामखेड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमित चिंतामणी यांनी जामखेड पोलिस स्टेशनला याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यात चिंतामणी यांनी म्हटले आहे की, २९ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कामाची तयारी करण्यासाठी चोंडी येथे गेलो होतो.

त्यावेळी मला सागर गवसणे याच्या मोबाइलवरून फोन आला. तुम्ही आमदार प्रा. राम शिंदे साहेबांच्या जवळ आहात. त्यांना जुळवून घ्यायला सांगा. नाहीतर पाहून घेईन, असे त्याने धमकावले. त्यावेळी मी काहीही न बोलता फोन कट केला.

त्यानंतर मी आमदार प्रा. राम शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व सागर गवसणे याने फोन केल्याची माहिती दिली. या घटनेनंतर सागर गवसणे याने ‘मैत्रीग्रुप’ या अकाउंटवरून फेसबुक लाईव्ह करत आमदार प्रा. राम शिंदे व काही अपरिचित व्यक्तींचे नाव घेऊन तुम्हास घरात घुसून मारण्याची धमकी दिली.

यामुळे दोन पक्षांच्या लोकांमध्ये तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह संवाद होता. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. तो व्हिडीओ मी फेसबुकवर पाहिला. अमित चिंतामणी यांच्या फिर्यादीवरून शिवीगाळ करणे, दोन गटात तेढ निर्माण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी कलम ५०४, ५०५ (२), ५०६ (२) नुसार सागर गवसणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe