अहमदनगरमध्ये ‘येथे’ काळ्या बाजाराचा कळस, ‘इतके’ छापे अन लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

घरगुती वापराच्या गॅसच्या टाक्या रिफिलिंग करून त्यांचा बेकायदेशीर साठा होत असलेल्या विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली. संगमनेर शहरातील विविध तीन गॅस रिफील सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून भरलेल्या गॅसच्या टाक्या, मशीन, रिक्षा, वाहने असा एकूण १५ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Ahmednagarlive24 office
Published:
karavai

Ahmednagar News : घरगुती वापराच्या गॅसच्या टाक्या रिफिलिंग करून त्यांचा बेकायदेशीर साठा होत असलेल्या विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली. संगमनेर शहरातील विविध तीन गॅस रिफील सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून भरलेल्या गॅसच्या टाक्या,

मशीन, रिक्षा, वाहने असा एकूण १५ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शहरातील अलका नगर व जोरवे नाका परिसरात केली. याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये पहिली कारवाई सकाळी ९:२० वाजेच्या सुमारास अलकानगर परिसरात हावडा ब्रीजच्या पाठीमागे एका लोखंडी टपरीमध्ये करण्यात आली. मोहसीन रफिक शेख (वय ३५), इम्रान रऊफ शेख (वय ३८),

इम्तियाज रफिक शेख (सर्व रा. अलकानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल आत्माराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या ठिकाणाहून १८ हजार रुपये किमतीचे ६ गॅस भरलेल्या घरगुती वापराच्या टाक्या, त्यातील एका टाकीस हाय प्रेशर रेग्युलेटर व ट्रान्सपर मशिन जोडलेले, २ रिकाम्या गॅस टाक्या, १ टाकी भारत मेंस कंपनीची व १ टाकी इंडेन कंपनीची टाकी,

३ हजार रुपये किमंतीची १ एच पी कंपनीची घरगुती वापराची गॅस भरलेली गॅस टाकी गॅस ट्रान्सपर रेग्युलेटर व गॅस नळी जोडलेली रिक्षा क्रमांक एम एच १५ शेड ८७५७, २५ हजार रुपये किमतीची रिक्षा, १५ हजार रुपये किमतीचा पंप असा एकूण ६८, ९०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास जोर्वे नाका, पुणे रस्ता येथे करण्यात आली. सोहेल शकील शेख (वय ३४, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) याच्याविरोधात पोलिस हेडकॉन्स्टेबल कानिफनाथ दत्तात्रय जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

तिसरी कारवाई जोर नाका परिसरातच केली. तेथे पोलिसांनी विविध प्रकारच्या गॅसच्या टाक्या वाहने मशीन असा एकूण १४ लाख ३१ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe