Ahmednagar News : विटांचा ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडल्याचे वृत्त अहमदनगरमधून समोर आली आहे. यामध्ये एक ठार तर तिघे जखमी असल्याची माहिती समजली आहे. हा अपघात संगमनेर रस्त्यावर रांजणगाव देशमुख हद्दीत झाला.
विटांचा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.

विटांनी भरलेला ट्रक (एम.एच १२ ईएफ ११२६) हा संगमनेरच्या दिशेने जात होता. रांजणगाव देशमुखच्या मिंधेवस्ती नजीक या ट्रकचे मागील टायर फुटल्याने ट्रक उलटला, असा अंदाज आहे. ट्रकमध्ये चालकासह आठ जण होते. त्यातील चार जण विटांवर बसलेले होते, ते विटांखाली दबले.
स्थानिकांनी त्या विटांखालून त्यांना वर काढून दवाखान्यात दाखल करण्यात आले. ते सर्व जण गंभीर जखमी होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तिघांवर उपचार सुरू आहेत. सर्व कामगार परप्रांतीय असल्याचे समजते.
अहमदनगर जिह्यात अपघाताच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकतीच कोल्हार परिसरात बुलेटवरून आपल्या घरी जाणाऱ्या दोघांना मालवाहू कंटेनरने जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यूझाल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात घडली होती.
यामध्ये देखील प्रशांत रवींद्र भुजबळ (वय ३३) व गोरख सयाजी पर्वत (वय ४०, दोघे रा. निंबाळे, ता. संगमनेर) असे मृत झाले होते. अहमदनगर जिल्ह्यात अपघातांचे व त्यात मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे.