Ahmednagar News : इको कार पलटी झाल्याने झालेल्या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना बेल्हे (ता. जुन्नर) शनिवार (दि. १) पहाटे चार वाजता नगर- कल्याण महामार्गावर बेल्हे जवळ घडली.
दरम्यान, झोपेत चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ईको गाडीतील लहान मुलगा, दोन महिला, २ पुरुष असे पाचजण प्रवास करत होते. दोन महिला गंभीर असून दोन पुरुष व लहान मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत.

सुमन निपूरते (वय ७०), संतोष बाने (वय ४०), वैशाली निपुरते ( वय ३५), कल्याणी नीचीते (वय २६) अशी जखमींची नावे असून इतर प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत. सर्व प्रवासी भिवंडी येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
पहाटे चारच्या सुमारास अपघाताचा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ सावकार पिंगट, भिवसेन पिंगट, निखिल गाढवे, संजय पिंगट, सचिन पिंगट, हरकू पिंगट यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले. जखमींना आळेफाटा येथील माऊली हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी झालेल्या महिलांना पुढील उपचारासाठी भिवंडी येथे पाठविण्यात आले आहे.