Ahmednagar News : बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत केले बदल : हे आहे कारण … ! वाचा सविस्तर …

Pragati
Published:

Ahmednagar News : दि. १९ जून पासून अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाकरीता भरती प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे. सदर भरतीच्या मैदानी चाचणी पैकी भरती उमेदवारांची धावण्याची चाचणी अरणगाव बायपासकडून बाळुंज बायपासकडे जाणाऱ्या वाहयवळण मार्गावर घेण्यात येणार आहे.

सदर रस्त्यावरुन मोठया प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. तसेच परीसरातील नागरीक जनावरे व पादचारी हे सदर रस्त्याचा वापर करीत आहेत. सदर रस्त्यावर भरती उमेदवारांची १६०० मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार असल्यामुळे भरतीकरीता आलेल्या उमेदवारांच्या धावण्यामध्ये व्यत्यय येणार आहे.

त्याचप्रमाणे वाहनांचा उमेदवारांना धक्का लागुन, अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ते कसे आहेत पहा.

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन दि. १९/०६/२०२४ ते दि. २९/०६/२०२४ रोजी दररोज सकाळी ६.०० वा. ते १४.०० वा.पावेतो अरणगाव बायपास कडुन वाळुंज बायपासकडे जाणारे बाहयवळण मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक स्थानिकांची वाहने, पादचारी व जनावरे यांना खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश पारीत करीत आहे.

१) अरणगाव बायपास चौक येथुन वाळुंज बायपासकडे जाणारे वाहयवळण मार्गावरील गहीले मळा, गंगाधर पवार, अरणगाव यांचे घरापासुन दरेकर वस्ती, किशोर दरेकर, वाळुंज यांचे घरापर्यंतची सर्व प्रकारची वाहने, पादचारी व जनावरे यांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

२) अरणगाव बायपास चौक येथून वाळुंज बायपासकडे जाणारे वाहयवळण मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक ही रस्त्याच्या उजव्या लेन ने डाव्या बाजुने जातील. व वाळुंज बायपास कडुन अरणगाव बायपासकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक वाहने ही डाव्या लेनने डाव्या बाजुने जातील.

प्रस्तुत आदेश भरती प्रक्रीयेकरीता वापरात येणारी वाहने, शासकीय वाहने व स्थानिक प्रशासनाकडुन अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe