Ahmednagar News : कॉलेज तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण, चार चाकी गाडी आली..आई भावासमोरच तिला ओढले, अन..

Pragati
Published:
apharan

 

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. श्रीरामपुरातील सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता राहुरीमधून कॉलेज तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण केल्याचे वृत्त आले आहे.

राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथे सिनेस्टाईल पद्धतीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून तीला चारचाकी वाहनात बसवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. १२ जून २०२४ रोजी घडली आहे. सदरील घटनेतील १७ वर्षे वय असलेली अल्पवयीन मुलगी ही १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असून ती कोल्हार परिसरात तीच्या कुटुंबासह राहते.

दि. १२ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान पिडीत मुलगी आई सोबत गवत घेण्यासाठी गेली होती. तेव्हा पिडीत मुलगी पूढे निघुन गेली व तीची आई, बहीण, भाऊ पाठीमागुन गवत घेवुन येत होते. त्यावेळी आरोपीने पिडीत मुलीला घेवुन एका पांढऱ्या रंगाची टाटा मॅझीक गाडीमध्ये बसवून तीचे अपहरण करून पळवून नेले.

पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी प्रशांत प्रविण भोसले, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी. याच्यावर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे करीत आहेत.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून राहुरी पोलीसांकडून सदर मुलीचा व मॅजिक गाडीचा शोध सुरु आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षितेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.