अहमदनगरमध्ये गोरक्षकांना टेम्पोखाली चिरडून मारण्याचा सिनेस्टाईल अघोरी थरार

गोरक्षकांना टेम्पोखाली चिरडून मारण्याचा थरार शुक्रवारी रात्री रंगला. रात्री अंधारात गायींची चोरटी वाहतूक करताना आढळलेल्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केल्याने ही अघोरी घटना घडली.

Published on -

Ahmednagar News : गोरक्षकांना टेम्पोखाली चिरडून मारण्याचा थरार शुक्रवारी रात्री रंगला. रात्री अंधारात गायींची चोरटी वाहतूक करताना आढळलेल्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केल्याने ही अघोरी घटना घडली.

या गोरक्षकांच्या बाईकचा अक्षरशः फुटबॉल झाला होता. गणीमहंमद शेख व साथीदार साहील सय्यद अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निमगाव जाळी येथून जाणाऱ्या औरंगपूर-गोगलगाव रस्त्यावर घडली.

या दोघांविरुद्ध आश्वी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. समजलेली अधिक माहिती अशी: या घटनेतील जखमी सागर चौधरी (१८, रा. गोगलगाव, ता. राहाता) हा दुचाकीवरुन मित्रासह या रस्त्यावरुन घराकडे निघाला होता.

यावेळी त्यांना औरंगपूर शिवारात पाटालगत टेम्पो (क्र. एम. एच.२०/ई जी. ९४८३) मधून दोन गावरान गाया व चार वासरांची निर्दयी वाहतूक होत असल्याचे दिसले. दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करुन, मागून येणाऱ्या टेम्पोला ‘त्या’ दोघांनी थांबविण्याचा इशारा केला,

मात्र गायांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाने थेट भरधाव वेगात दोघांच्या अंगावर टेम्पो घातला, मात्र दोघांचे दैव बलवत्तर असल्याने ते बालंबाल वाचले, मात्र टेम्पोच्या धडकेने दुचाकीचा अक्षरशः फुटबॉल झाला.

दोघे दुचाकीवरुन बाजूला फेकले गेले.आश्वीतील समद गणीमहंमद शेख (२०) तरुण टेम्पो चालवित असल्याचे व शेजारी साहील सय्यद (पूर्ण नाव माहित नाही) बसल्याचे त्या दोन्ही जखमी तरुणांनी पाहिले. या घटनेनंतर किरकोळ जखमी झालेल्या तरुणाने मोबाईलवरुन गावातील मित्रांना या घटनेची माहिती दिली.

जखमी सागर चौधरी याला सुरुवातीला लोणी येथे प्राथमिक केंद्रात व नंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर काही वेळेत लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात बजरंग दलाच्या गोरक्षकांची मोठी गर्दी जमा झाली.

यामुळे रात्री औरंगपूर व गोगलगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe