अवैध दारू, मटका, जुगार विरोधात नागरिक आक्रमक ! पोलिसांवरही ठाकरे सेनेचे शरसंधान

शहरात अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, नशेच्या गोळी विक्री खुलेआम सुरू असून ते तात्काळ बंद करावे, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि अवैध व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांची तातडीने बदली करावी, अशी मागणी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Ahmednagarlive24 office
Published:
crime

Ahmednagar News : कोपरगाव शहरात अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, नशेच्या गोळी विक्री खुलेआम सुरू असून ते तात्काळ बंद करावे, ठिकठिकाणी धाडसत्र राबवावे आणि अवैध व्यवसायांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांची तातडीने बदली करावी, अशी मागणी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

येथील तहसील कार्यालयात खासदार व महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. यावेळी अवैध दारू, मटका, जुगार तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी जोरदार हल्लाबोल केला. गुरुवारी खासदार भाऊसाहेब वाकचौरे येथील तहसील कार्यालयात बैठकीसाठी आले होते.

त्यावेळी त्यांच्याबरोबर शिवसैनिक होते. या ठिकाणी झालेल्या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला गेला. बैठकीत शिवसैनिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी तहसीलदार संदीपकुमार भोसले यांची उपस्थिती होती. त्यांनीदेखील अवैध व्यवसायांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव म्हणाले, शहरात अवैध मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी,

नशेची गोळी, हातभट्टी दारूची सर्वत्र विक्री सुरू आहे. पोलीस हे अवैध धंदे बंद असल्याचा दावा करीत आहे; मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. ठिकठिकाणी गावठी दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक सुरू आहे. मटक्याची दोन ठिकाणे असतानाही पोलिस धाडी घालून दारूचे अड्डे उद्ध्वस्त करीत नाही.

शहरी व ग्रामीण नागरिकांचा दारू, मटका, जुगारला ऑनलाईन लॉटरी, चरस, गांजा विक्रीला प्रचंड विरोध असतानाही हे धंदे चालविले जात असल्याचा प्रकार कैलास जाधव यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिला.यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,

माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, कैलास जाधव, सनी वाघ, कालूआप्पा आव्हाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. संदीप वर्षे, वर्षा शिंगाडे, मुकुंद सिनगर, मनोज कपोते, विशाल झावरे, राहुल देशपांडे आदीसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

अवैध धंदे बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला असला, तरी प्रत्यक्षात आजही सर्व अवैध धंदे सर्रास सुरू असल्याचा प्रकार सनी वाघ यांनी यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिला.

नशेच्या गोळ्या व गांजा, यासारख्या नशेमुळे शहरातील तरुण पिढी बेभान झाली आहे. कुणाची त्यांना ओळख राहिली नाही. नशेमुळे युवक वाटेल ते धाडस करण्याच्या घटना शहरात वाढल्या आहेत.

त्यामुळे बाजार तळातील भांगरे व्यापारी संकुल शहरातील नव्याने विकसित होत असलेल्या भागातील ओपन प्लॉट युवकांचे अड्डे बनले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गस्त घालून बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे ठाकरे सेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe