Ahmednagar News : महाविद्यालयीन मुलीवर अत्याचार, आईने आरोपीस समजावून सांगितले, त्याने पुन्हा केला अत्याचार..

Pragati
Published:
atyachar

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अलीकडील काही दिवसांत महिलांवरील अत्याचारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता महाविद्यालयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

हा प्रकार आईला समजल्यावर आरोपीला समजावून सांगितले परंतु त्याने पुन्हा त्या मुलीवर अत्याचार केला. अधिक माहिती अशी : संगमनेर शहरालगतच्या परिसरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस सह्याद्री कॉलेजजवळ राहणाऱ्या विशाल संपत बोऱ्हाडे याने आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी बोऱ्हाडे याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. नराधमाने या मुलीला वेळोवेळी फूस लावून त्याच्या राहत्या घरी नेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. ही गोष्ट मुलीने आईला सांगितली.

पती हयात नसतांना मुलींच्या जीवनात अंधार पडू नये म्हणून विशाल बोऱ्हाडे याला समजावून सांगण्याचा आईने प्रयत्न केला. तो फार दिवस टिकला नाही. या दरम्यान गेल्या चार जूनला विशाल बोऱ्हाडे याच्यासह ती अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाले.

आईने सर्वत्र त्यांचा शोधले, ते दोघेही मिळून आले नाहीत. ती मुलगी विशाल बोऱ्हाडे सोबतच असल्याचे समोर आले. आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विशाल संपत बोऱ्हाडे विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो सध्या फरार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe