Ahmednagar News : मुख्यमंत्र्यांकडून महामंडळाची घोषणा, ११९५ पासून आतापर्यंत चौंडीला भेट देणाऱ्या मंत्र्यांकडून कोट्यवधींचा निधी, पहा कुणी काय दिले

Ahmednagarlive24 office
Published:
mukhyamntri in chaundi

Ahmednagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९९ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.३१) जामखेड तालुक्यातील चौंडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. याआधीही अनेकदा भेट देणाऱ्या मंत्र्यांकडून आजवर कोट्यवधींचा निधी येथे देण्यात आलाय. टाकुयात एक नजर..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कालच्या कार्यक्रमात (३१ मे) बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राम शिंदे व गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला, परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकले व त्यानंतर नाव बदलले. आम्ही मनमोकळेपणाने शब्द देतो व ते पूर्ण करतो.

आदिवासी समाजाला ज्या २२ योजनांचा लाभ दिला जातो त्या योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावे, यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धरतीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे अशी घोषणा त्यांनी केली.

इतर मंत्र्यांची कामगिरी व निधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २०० व्या पुण्यतिथीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी २५ ऑगस्ट १९९५ रोजी चौंडीत हजेरी लावली. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांनी चौंडीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी विविध विकास कामांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

अहिलेश्वर मंदिर, महादेवमंदिर, चौंडेश्वरी मंदिर, जन्मघर गढी, हनुमान मंदिर यासह अनेक वास्तूचा जीर्णोद्धार झाला. ११ सप्टेंबर १९९६ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या उपस्थित झालेल्या २०१ व्या पुण्यतिथीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हेही उपस्थित राहिले.

यावेळी मुख्यमंत्री जोशी यांनी चौंडीतील विकासकामांना निधी दिला. त्यामुळे अन्य विविध विकास कामांबरोबरच सीना नदीवर मोठा पूल, सीना नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधतानाच या बंधाऱ्याचा कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यासारखी महत्त्वाची कामे झाली.

सीना नदीवर तब्बल ९० लाख रुपये खर्चाचा पूल बांधण्यासाठी तत्कालीन राज्य मंत्रिमंडळातील बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी विशेष निधी देऊन, या पुलाचा शुभारंभ केला. ३१ मे २००१ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी चौंडीत हजेरी लावली.

यावेळी त्यांनी चौंडीला विकासकामांना भरीव निधी देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात सन २०१७ ला चौंडीत दोन हेलिपॅड ही तयार करण्यात आली. चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करताना साधारण ५० कोटीहून अधिक रकमेची कामे झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe