Ahmednagar News : ‘निळवंडे’चे आवर्तन बंद न केल्याने तीन जवानांसह तरुणाचा मृत्यू, पालकमंत्री विखे यांनी कोणतेही लेखी पत्र न देता दिले होते पाणी सोडण्याचे आदेश?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कोणतेही लेखी पत्र न देता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्या आवर्तनात दोन युवक व तीन जवानांसह स्थानिक तरुण बुडाले.

त्यांचा शोध घेण्यास काही काळासाठी निळवंडे धरणातून आवर्तन बंद न केल्यामुळेच तीन जवानांसह एक युक्क बुडून मरण पावले असा आरोप करत सुगाव बुद्रुक येथील दुर्घटनेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे हेच जबाबदार असून त्यांनी तत्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्याकडे निवेदन देऊन केली.

दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदार संघातील प्रचारादरम्यान उत्कर्षा रुपक्ते आपल्या चारचाकीतून राजूर येथून संगमनेरकडे जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून त्यांच्या चारचाकीवर हल्ला केला. मात्र, अद्याप राजूर पोलिसांना यातील आरोपींचा शोध लावला नाही. या घटनेतील हल्लेखोर शोधून दोषींवर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन उत्कर्षा रूपवते यांच्यासमवेत वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यातील तहसीलदारांना गुरुवारी देण्यात आले.

तहसीलदारांना हे निवेदन देताना उत्कर्षा रुपवते यांच्यासोबत रिपाइंचे माजी तालुकाध्यक्ष शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे, चंद्रकांत पवार, किशोर रुपवते, अनुराधा आहेर, प्रकाश जगताप आदींसह वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोले तालुक्यातील ग्रामीण भागांत व भंडारदरा धरण परिसरातून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, याअनुषंगाने गुरुवारी अकोले तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्याचे ठरले, पण निवडणूक आचारसहिंता नियमांचे पालन व तहसीलदार यांच्या आदेशानुसार आम्ही बैठकीस हजर राहिलो, असे वंचितचे तालुकाध्यक्ष रवींद्र पवार यांनी स्पष्ट केले.

सुगाव बुद्रुक येथे पाण्यात बुडून मरण पावलेल्या दुर्घटनेत गणेश देशमुख हे शहीद जवानांच्या मदतीला माहीतगार म्हणून गेले असता त्यांचाही बुडून मृत्यू झाला. जवानांसारखेच त्यांनाही शहिदाचा दर्जा देण्यात यावा. शासनाने यातील पीडित कुटुंबीयास आर्थिक मदत द्यावी.

कोणतेही लेखी पत्र न देता पालकमंत्री विखे यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले, त्या आवर्तनात बुडालेल्या दोन युक्कांचा शोध घेण्यास काही काळासाठी धरणातून आवर्तन बंद न केल्यामुळेच तीन जवानांसह एका स्थानिक युवकाचा नाहक मृत्यू झाला. या गोष्टींला पालकमंत्री राधाकृष्ण विखे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe