Ahmednagar News : छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना, नागरिक आक्रमक, नगर – मनमाड महामार्ग रोखला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव येथे नगर - मनमाड महामार्गावरील साईतपोभुमी चौकात शुक्रवारी (दि.२८) जुन रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.

Published on -

Ahmednagar News : पुण्यातील हडपसर (ससाणेनगर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विकृत मनोवृत्तीच्या माथेफिरुने विटंबना केल्याची घटना उघडकीस आली.

या घटनेच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव येथे नगर – मनमाड महामार्गावरील साईतपोभुमी चौकात शुक्रवारी (दि.२८) जुन रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. तिथे रस्त्यावरच ठाण मांडून आंदोलनकर्ते बसल्याने त्या परिसरातील वाहतूक खंडित झाली होती.

काही काळानंतर तहसीलदार संदिपकुमार भोसले यांना निवेदन देऊन रास्तारोको थांबवण्यात आला. यावेळी उपस्थितांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहरात झालेल्या घटनेचा निषेध करुन यापुढे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सरकारने योग्य ती कारवाई करावी, महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी. देशाची एकता व एकात्मता यांना जोडणारे राष्ट्र पुरूष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा महाराष्ट्रात सतत चालू असलेला अपमाना बाबत आरोपीस १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित व्हावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कलविंदर सिंग दडियाल, संतोष गंगवाल, अनिल गायकवाड, गणेश शिंदे, आकाश बेग, समिर माळवे, श्रेया कुलकर्णी आदी आंदोलनकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवेदनावर राहुल विजय चव्हाणके, गौरव शंकर गंगुले,

सुनील सुरेश भालेराव, विकी भाऊसाहेब गाडेकर, विकी रवींद्र चव्हाण, जय सिनगर, रोहित दयानंद पवार, अमोल लक्ष्मण लोखंडे, नवनाथ ताकवले, महेश हजारे, गणेश भवर, प्रदीप थोरात, आदिनाथ कर्डक यांच्या सह्या आहेत.

कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सपोनि रोहिदास ठोंबरे, सपोनि महेश भामरे यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक विभागाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News