Ahmednagar News : लोकसभा निकालानंतर अतिउत्साह दाखवू नका ; पोलिसांनी घातले ‘हे’ निर्बंध

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : मंगळवारी, ४ रोजी लोकसभेची मतमोजणी सुरु आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह त्यांचे समर्थक डीजेच्या दणदणाटात गुलालाची उधळण करत मिरवणूक काढतात. मात्र पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत.

लोकसभा निकालानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे प्रकाशित करणे, तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करणे, डीजे वाजवणे, फटाके फोडणे तसेच विनापरवानाविजयी मिरवणुकीवर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत.
याबाबत पोलिसांकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १० मार्च ते ४ जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निकाल मंगळवारी, ४ रोजी जाहीर होणार आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शक्यतो व्हाट्सअप ग्रुपचे ऍडमिन यांनी ३ ते ६ या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओन्ली ऍडमिन करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह सर्व ग्रूप अॅडमिनला जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe