खुशखबर ! अहमदनगरमधील ‘या’ ४५ गावातील कोरडवाहू शेतीला मिळणार कुकडीचे पाणी ! ४५ वर्षांनंतर यश

कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात महत्वपूर्ण गोष्टीचा समावेश झाला असल्याने यात अहमदनगरकरांसाठी एक खुशखबर आली आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणीवाटप ज्या ज्या वेळी व्हायचे त्या त्या वेळी पारनेरच्या कोरडवाहू भागासाठी पाणीच शिल्लक नसल्याचे संगितलं जायचे.

Ahmednagarlive24 office
Published:
kukadi

Ahmednagar News : कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात महत्वपूर्ण गोष्टीचा समावेश झाला असल्याने यात अहमदनगरकरांसाठी एक खुशखबर आली आहे. कुकडी प्रकल्पाचे पाणीवाटप ज्या ज्या वेळी व्हायचे त्या त्या वेळी पारनेरच्या कोरडवाहू भागासाठी पाणीच शिल्लक नसल्याचे संगितलं जायचे.

आता पारनेर तालुक्यातील कोरडवाहू भागातील ४५ गावांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा समावेश कुकडी सुधारित जलनियोजन अहवालात होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व उपसा जलसिंचन योजना समितीचे प्रमुख विश्वनाथ कोरडे यांनी दिली.

जलसिंचन योजनाबाबत कान्हूर पठार (ता. पारनेर) येथे आयोजित सिंचन शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव शिंदे, कान्हूर पठार गावचे माजी सरपंच गोकुळ काकडे आदींसह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

विश्वनाथ कोरडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याच्या पत्रांच्या प्रति उपस्थितांना दाखविल्या. २१ जून २०२४ मध्ये सामंजस्य कराराचा व कुकडी इरिगेशन सर्कल, पुणे यांच्या १३ जून २०२४ रोजीच्या पत्राचा संदर्भ दिला. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता,

कुकडी पाटबंधारे विभागक्रमांक १ नारायणगाव यांच्याकडे खंडेश्वर उपसा सिंचन योजना समाविष्ट करण्याची नवीन मागणी स्थानिक लोकांकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारशीसह प्राप्त झाल्याचा उल्लेख केला आहे. पारनेर तालुक्यातील खंडेश्वर उपसा सिंचन योजना या ४५ गावांतील ३४८८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असलेल्या योजनेच्या मागणीचा समावेश करण्यासंदर्भात कुकडी सुधारित जलनियोजन अहवाल तयार करताना विचार करावा,

असा आदेश केल्याचे त्यात म्हटले आहे. कोरडे यांनी उपसा सिंचन योजनेबाबत मिळविलेले यश हे या योजनेच्या ४५ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठे यश आहे. यापुढे त्यांनीच योजनेच्या पूर्ततेसाठी नेतृत्व करावे, असा विचार मांडत तालुक्यातील या भागातील जनतेने राजकारण दूर ठेवून काम करणाऱ्या माणसाच्या सोबत उभे राहिले पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe