इअर टॅग नसल्याने जनावरांना बाजारात प्रवेश देईनात, शेतकरी-अधिकाऱ्यांत बाचाबाची होत राडा

जनावरांच्या आठवडे बाजारात बाजार समितीमध्ये शेतकरी-अधिकाऱ्यांत बाचाबाची होत राडा झाल्याचे वृत्त आले आहे. इअर टॅग नसलेल्या जनावरांना आठवडे बाजारात प्रवेश नाकारला जात आहे. त्यामुळे बाजार समिती आवारात गोंधळ उडत बाचाबाची झाली. हा प्रकार कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घडला आहे.

Published on -

Ahmednagar News : जनावरांच्या आठवडे बाजारात बाजार समितीमध्ये शेतकरी-अधिकाऱ्यांत बाचाबाची होत राडा झाल्याचे वृत्त आले आहे. इअर टॅग नसलेल्या जनावरांना आठवडे बाजारात प्रवेश नाकारला जात आहे.

त्यामुळे बाजार समिती आवारात गोंधळ उडत बाचाबाची झाली. हा प्रकार कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घडला आहे. अधिक माहिती अशी : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारचा आठवडे बाजार भरतो. येथे पशुमालक आपली जनावरे घेऊन आली होती. परंतु ज्या जनावरांना इअर टॅग लावला असेल त्या जनावरांनाच प्रवेश मिळेल असे पशुमालकांना अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी ईअर टॅगिंग असलेल्या जनावरांना आत घेतले त्यानंतर मात्र गेट लावून घेण्यात आले. त्यामुळे प्रचंडन जनावरे हे बाहेरच राहिली. परिणामी बाजारात समितीच्या दोन्ही गेट बाहेर जनावरे व पशुपालक यांची गर्दी झाली. यामुळे वाहतूक कोंडी देखील याठिकाणी झाली. दरम्यान बाजारात प्रवेश मिळावा यासाठी पशुपालकांनी आग्रह धरला.

यामुळे पशु मालक आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे बराच वेळ गोंधळ उडालेला पाहायला मिळाले. हा गोंधळ बराच वेळ सुरु होता. त्यामुळे पशु मालक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

शेवटी शेतकऱ्यांच्या रोषापुढे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी नमते घेतले व टॅग नसलेल्या जनावरांना देखील आतमध्ये येऊ दिले. शासनाच्या नव्या नियमानुसार जनावरांना ईअर टॅगिंग करणे बंधनकारक असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे

. जर आता तसे झाले नाही तर मात्र पुढील आठवड्यापासून ईअर टॅगिंग नसलेल्या जनावरांना प्रवेश मिळणार नसल्याचेही त्यांनी खडसावले असल्याचे समजते. जवळच्या पशु वैद्यकीय केंद्रावर जाऊन पशूंना टॅग करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News