Ahmednagar News : विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहारात विविध पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. आता शालेय पोषण आहारात आता नवीन मेन्यू पुन्हा दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या २ लाख ७१ हजार ४५५ आणि सहावी ते आठवीपर्यत्तच्या एक लाख ८० हजार ९९१ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार,
मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणीसत्व यांचा समावेश करण्यात आला आहे. दर बुधवारी उकडून अंडी देण्याऐवजी आता अंडी पुलाव देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत पाककृती राबविताना वाडी वस्तीवरील शिक्षकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागेल. शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, जेणेकरून शिक्षकांना जास्त वेळ अध्यापनाला देता येईल.
तसेच प्रत्येक सरकारी योजना विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे. परंतु प्रत्येक योजनेमागे कागदपत्रांचे काम वाढते.
त्याचा शिक्षकांना त्रास होतो. ही कामे त्रयस्थ यंत्रणेकडून करून घ्यावीत. शिक्षकांवर ताण पडू नये असे मत काही शिक्षक मांडत आहेत.
असे आहे नियोजन
नाचणीच्या वड्या दर शनिवारी द्यायच्या आहेत. यासाठी एक किलो नाचणी, २०० ग्रॅम सोयाबीन तेल, ३०० ग्रॅम साखर किंवा गूळ व मीठ वापरण्याच्या सूचना आहेत.
पहिली ते पाचवी १०० ग्रॅम व सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम तांदूळ शिजविला जातो. तोही शिल्लक राहतो. त्यामुळे ८० ग्रॅम शिजवून उर्वरित २० ग्रॅम तांदूळ खिरीसाठी वापरायचा आहे. खिरीसाठी लागणारी साखर, गूळ खरेदीसाठी शासन पैसे देणार आहे.