Ahmednagar News : एक विवाह असाही.. लग्नात आईकडून नवरीची पुस्तकतुला !

Ahmednagar News

Ahmednagar News : लग्न हा एक सोळा संस्कारापैकी एक संस्कार. जन्मोजन्मीचे अतूट नाते यावेळी जुळते. परंतु अलीकडील काळात लग्नाची रुपरेषाच बदलली आहे. अगदी मेकअप पासून तर जेवणापर्यंत..सगळं सगळं बदललं आहे.

आता लग्न म्हटलं की समोर येते तो म्हणजे भपकेबाज दिखाऊपणा व पैशांचा चुराडा. आज लग्नात लाखो रुपयांचा चुराडा अनावश्यक गोष्टींवर केला जातो. परंतु हौसेला मोल नसते असे म्हणत प्रत्येकजण याकडे दुर्लक्ष करतो.

असे असले तरी समाजात आणखी एक वर्ग असाही की तो लग्नात होणारा खर्च समाजकार्यासाठी खर्च करतो, तसे उपक्रम राबवतो. असे असे अनेक उदाहरणे आहेत. आता अहमदनगरमध्ये टाकळीभान येथील एका लग्नाची

अशीच एक गोष्ट कौतुकाचा विषय ठरला आहे. टाकळीभान येथील या लग्नात मुलीच्या आईने नवरीची पुस्तकांने तुला केली. ही सदेव पुस्तके शाळा, महाविद्यालयाला भेट देण्यात आली.

प्रा. डॉ. सरोजिनी कापसे असे मुलीच्या आईचे नाव आहे. विधिज्ञ स्व. सर्जेराव कापसे पाटील यांची कन्या ऐश्वर्या व आश्वी येथील नंदकिशोर गायकवाड पाटील यांचे चिरंजीव महेश यांचा विवाह श्रीरामपुरात पार पडला.

‘ग्रंथ हेच गुरू‘ असे मानणाऱ्या प्रा. कापसे यांच्या अनोख्या संकल्पनेचे कौतुक होत आहे. पुस्तक तुला झाल्यानंतर डॉ. जोसेफ मर्फी लिखित ”द पॉवर ऑफ युअर सबकॉन्सियस माईंड” या पुस्तकांच्या प्रती श्रीरामपूर तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये व वाचनालयांना देण्यात आल्या.

अशी सुचली संकल्पना

मुलांना वाचण्याची सवय नाही, मुले वाचत नाही असे म्हटले जाते. पण युवा पिढीची वाचनाचे विषय वेगळे असून त्यांना भावणारी पुस्तकं ती नक्कीच वाचतात असे मत प्रा. डॉ. सरोजिनी कापसे यांचे आहे.

आपण वाचलेलं, आपल्याला आवडलेलं पुस्तक सर्वाना भावेल असा विचार त्यांच्या मनात आला. यातूनच डॉ. सरोजनी कापसे यांनी आपल्या मुलीची पुस्तकाने तुला करत ही पुस्तके शाळा, महाविद्यालयांना भेट म्हणून दिली.

किती पुस्तके वाटली गेली ?

नववधूची पुस्तकतुला करताना यामध्ये तब्बल ३०० पुस्तके लागली. या सर्व पुस्तकांची किंमत ३५ हजार रुपये आहे. ही ३०० पुस्तके पुस्तके श्रीरामपूर तालुक्यातील १५ विद्यालयांत व सहा महाविद्यालयांत आता दिली जाणार आहेत.

हे पुस्तक वाचून २० लोकांनी जरी यातील विचार आत्मसात केले तरी आपला विवाह सोहळा सफल झाला असे मी मानेल असे प्रा. कापसे म्हणाल्या आहेत. दरम्यान या सोहळ्याचे मोठे कौतुक होत आहे.

अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सर्वच राबवले गेले पाहिजेत असे आवाहन विवाहानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe