अहमदनगरमधील ‘त्या’ कला केंद्रातील महिलांचे शोषण? खळबळजनक माहिती समोर

कला केंद्र व त्याबतीतील असणारे अनेक प्रश्न अनेकदा डोके वर काढताना दिसतात. या समस्यांवरून अनेकदा उपोषणे किंवा निवेदनेही देण्यात आलेली आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा जामखेड येथील कला केंद्र चर्चेत आलेय.

Published on -

Ahmednagar News :  कला केंद्र व त्याबतीतील असणारे अनेक प्रश्न अनेकदा डोके वर काढताना दिसतात. या समस्यांवरून अनेकदा उपोषणे किंवा निवेदनेही देण्यात आलेली आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा जामखेड येथील कला केंद्र चर्चेत आलेय.

त्याचे कारण म्हणजे जामखेडमधील विविध कला केंद्राच्या संचालिका व महिला नृत्य कलावंतांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत केलेला आरोप व त्यांच्याकडे केलेली मागणी.

या कला केंद्रातील महिला कलावंतांचे काही अपप्रवृत्तींकडून आर्थिक व शारीरिक शोषण होत असल्याचा आरोप करत, त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केलीये.

यावेळी महाराष्ट्र लोकनाट्य व सांस्कृतिक कला केंद्र मालक संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, मनसे जामखेड तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे,

वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष आतिश पारवे, बंडू मुळे आदी यावेळी उपस्थित होते. या निवेदनात असे म्हटले आहे की, जामखेडमधील कला केंद्रामधील कुठल्याही हार्मोनियम वादक (पेटी मास्तर), ढोलकी वादक (वस्ताद) व सोंगाड्या यांना कामावरून काढून टाकलेले नाही.

कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या संकटानंतर अनेक वादक व सोंगाड्या यांनी उपजीविकेचे साधन म्हणून पर्यायी व्यवसाय व मोलमजुरी सुरू केली होती. तसेच जामखेडमधील कुठल्याही कला केंद्रावर पारंपरिक वाद्याव्यतिरिक्त डीजे सिस्टीम किंवा होम थिएटर सिस्टीम वापरली जात नाही.

तसेच कला केंद्र मालक व वादक यांच्यामध्ये दरवर्षी मानधना बाबतचा आर्थिक करार केला जातो तसेच मास्तर व वस्ताद यांना (वादक) यांना लाखो रुपये उचल दिली जाते. काही वादक एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीकडे जातात.

त्यावेळी पार्टी मालकीण किंवा कला केंद्र मालक यांनी त्यांना दिलेली उचल परत मागितली असता भांडणे, मारामारी व शिवीगाळ करतात. उचल बुडवितात तसेच महिला कलावंतांचे आर्थिक व मानसिक शोषण करतात.

तसेच कला केंद्र मालक व पार्टी मालकीण यांना वेठीस धरतात. प्रशासनाला चुकीची माहिती देऊन विपर्यास केला आहे असे त्यांनी म्हटलंय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe