Ahmednagar News : पावसाने जिल्हाभरात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांच्या शेडचे पत्रे उडाले, तर वादळी वाऱ्याने अनेक मोठे झाडे कोसळल्याने वीजेचे खांब देखील वाकले आहेत.
बुधवारी दुपारनंतर मृगाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार सुरुवात झाली होती. या वादळामुळे नगर, संगमनेर, कोपरगाव आदीसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान, शेडचे पत्रे उडाले, झाडे कोलमडले, वीज पुरवठा खंडीत झाला. तसेच शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे होत असलेले नुकसान पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बुधवारी दुपारनंतर अचानकपणे आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, ओझर, माळेवाडी, शिबलापूर आणि परिसराला चांगलेच झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले. तर झाडे उन्मळून पडले असून, पुढील धोका टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
बुधवारी सकाळपासूनच आश्वीसह परिसरात वातावरण दमट झाले होते. त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती. दुपारनंतर अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. आर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने रौद्र रुप धारण केल्याने आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, शेडगाव, ओझर, शिबलापूर, प्रतापपूर परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली.
दरम्यान, या वादळी पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे देखील नुकसानीसह शेडचे पत्रे उडाले, तर वादळी वाऱ्याने अनेक मोठे झाडे कोसळल्याने वीजेचे खांब देखील वाकले आहेत. त्यामुळे या भागातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
परिसरातील गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या पावसात शिबलापूर येथील एकनाथ सखाराम नागरे यांच्या राहत्या घराचे तसेच ट्रान्सफार्मर रिपेरिंग वर्कशॉपचे साधारण ७ ते ८ लाख रुपयाचे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने तातडीचे पंचनामे करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.