शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी…, अहमदनगरमधील दोन तरुणांची उत्तुंग भरारी

कष्टाने व जिद्दीने यशाला गवसणी घालता येते. परिस्थिती कशीही असली तरी जिद्दीपुढे परिस्थितीही झुकवता येते. हेच जणू सिद्ध केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या मुलांनी.

Published on -

Ahmednagar news : कष्टाने व जिद्दीने यशाला गवसणी घालता येते. परिस्थिती कशीही असली तरी जिद्दीपुढे परिस्थितीही झुकवता येते. हेच जणू सिद्ध केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांच्या मुलांनी.

यातील एकाचे नाव आहे प्रतीक सुरेश तोरडमल . कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील प्रतीक सुरेश तोरडमल हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक झाला आहे. याबद्दल त्याचा कर्जत व बहिरोबावाडी येथे नागरी सत्कार करण्यात आला.

कर्जत केमिस्ट असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुरेश तोरडमल यांचा मुलगा प्रतीक हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. कर्जतकरांच्या वतीने फटाके फोडून व हलगीच्या झाल्याबद्दल प्रतीक तोरडमल यांची तालावर मिरवणूक काढण्यात आली.

दुसऱ्या युवकाचे नाव आहे शिवशंकर कुडेकर. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील शेतकऱ्याचा मुलागा शिवशंकर कुडेकर यांची पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. शिवशंकर कुडेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडगाव येथून शिक्षण घेऊन आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

संगमनेर महाविद्यालयात बीएससी (फिजिक्स) ची पदवी घेतली. पोलिस दलामध्ये अधिकारी होण्याचे त्यांचे स्वपन होते. यासाठी पुणे येथे जाऊन एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. यानंतर त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

अनेक कठीण प्रसंगानंतर शिवशंकरला यश प्राप्त झाले. शिवशंकर अतिशय नम्र स्वभावाचा असून जिद्द आणि चिकाटीच्या बळावरच त्याने यश संपादन केले आहे. वडील सुरेश कुडेकर मंडपाचा व्यवसायातून शेतीकडे वळाले. खांडगाव मध्ये वाट्‌याने शेती करतात.

अर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. शिवशंकर आणि सगळी परिस्थितीची जाणीव होती आणि म्हणून त्याने हे वडिलांच्या कष्टाचं कष्टाला सार्थ ठरवत पोलीस उपनिरीक्षक पदावर उंच भरारी घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe