दोन गटात तुफान मारामारी, दोघे जखमी, अहमदनगरमधील घटना

दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. धक्कादायक बाब म्हणजे भांडण सोडविण्याच्या कारणावरून या दोन गटात मारामारी झाली. या दोन गटातील हाणामारीमध्ये दोघे जखमी झाले. ही घटना संगमनेर मध्ये घडली.

Pragati
Published:
hanamari

Ahmednagar News : दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. धक्कादायक बाब म्हणजे भांडण सोडविण्याच्या कारणावरून या दोन गटात मारामारी झाली. या दोन गटातील हाणामारीमध्ये दोघे जखमी झाले. ही घटना संगमनेर मध्ये घडली.

संगमनेर तालुका पोलीसानी दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल आहेत. यात जवळे कडलग येथील तीन आणि गणोरे येथील चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पहिल्या घटनेत संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील पान सुपारी मळ्या जवळील निळवंडे डाव्या कालव्यावर गणोरेतील तरुण दारू पिऊन धिंगाणा घालत होते. याचा जाब विचारलेल्या रामनाथ सुर्वे यांना ढकलून दिले. नंतर जमावाने येऊन महेंद्र सुर्वे यास लाथा बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली.

त्यांची पत्नी, आई, वडील, मुली, मुलगा यांनाही मारहाण केली. यात सुर्वे यांच्या पत्नीचे मंगळसूत्र गहाळ झाले. या प्रकरणी समर्थ दामू आंबरे, अथर्व रामू दातीर, सुशील आंबरे, दीपक दातीर (सर्व रा. गणोरे ता. अकोले) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या घटनेत अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथून एक महिला पतीसह गणोरे येथे जात होती. जवळे कडलग निळवंडे डाव्या कालव्याजवळ आले असता तेथे सुरज दातीर याचे भांडण सोडविल्याचा राग धरून दाम्पत्याला महेंद्र सुर्वे,

बाळासाहेब देशमुख, किशोर सुर्वे (रा. जवळे कडलग) आणि इतर तिघांनी मारहाण केली. महिलेच्या पोटात लाथ मारून किशोर सुर्वे याने तिचे कपडे ओढत विनयभंग केला. मारहाणीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले अशी माहिती समजली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe