फ्लॉवरने दिले आर्थिक बळ, अहमदनगरमधील शेतकऱ्याने नवप्रयोगातून साधली उन्नती

अहमदनगरमधील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. या प्रयोगातून शेतकरी आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करत असतो. अकोलेतील काळा गहू असेल, संगमनेरमधील सफरचंद प्रयोग असेल किंवा श्रीगोंदेतील खरबूज प्रयोग असेल. शेतकरी सध्या नवनवीन प्रयोग करत आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
flower

Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. या प्रयोगातून शेतकरी आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करत असतो.

अकोलेतील काळा गहू असेल, संगमनेरमधील सफरचंद प्रयोग असेल किंवा श्रीगोंदेतील खरबूज प्रयोग असेल. शेतकरी सध्या नवनवीन प्रयोग करत आहेत. आता संगमनेरमधील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात फ्लॉवर पीक घेत नवप्रयोग केला आहे.

नवनाथ जयराम भागवत असे या शेतकऱ्याचे नाव असून ते संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील आहेत. त्यांनी तीन एकर शेतीमध्ये नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे फ्लॉवर भाजीपाला फुलविला आहे.

सध्या बाजारात फ्लॉवरला चांगली मागणी असून, फ्लॉवरपासून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे, आर्थिक आधार ठरले आहे. भागवतवाडी शिवारातील तीन एकर शेतीमध्ये नवनाथ भागवत यांनी तीन बाय दीड अंतरावर

सुपर क्षीप्रा जातीच्या फ्लॉवर रोपांची लागवड केली. लागवडीसाठी शेण खत, डेलीगेट ही खते वापरण्यात आली. फ्लॉवर पिकावर फवारणी करण्यासाठी फ्लुअन्स, सायमॉस, एसिटॉप, सेवर ही औषधे वापरली. पिकास प्रवाही सिंचन पद्धतीद्वारे विहिरीचे पाणी दिले.

फ्लॉवर भाजीपाला पीक साधारणपणे ७० ते ७५ दिवसांत काढण्यासाठी आले. सध्या बाजारात चांगली मागणी असून, प्रति किलो १४ ते १५ रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले.

अहमदनगरमधील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. या शेतीतून या शेतकऱ्याने आर्थिक उन्नती साधली.

परिश्रम चिकाटी असेल तर नक्कीच चांगले फळ मिळते याचेच हे एक उदाहरण आहे. अनेक नवयुवक शेतकऱ्यांना यातून प्रेरणा मिळेल हे नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe