Ahmednagar News : आता स्वस्तातला नाष्टा विसरा ; त्यावरही लागणार ‘जीएसटी’

Published on -

Ahmednagar News : सकाळी घरातून बाहेर पडताना प्रत्येकजण नाष्टा करून बाहेर पडतोच असे नाही. त्यामुळे अनेकजण कामाच्या ठिकाणी किंवा आवडीच्या हॉटेलात नाष्टा करतात. यात इडली, डोसा हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा झाला आहे. परंतु आता इडली, डोशाचा नाष्टा करणे देखील महाग होणार आहे. कारण यात वापरल्या जाणाऱ्या जाणाऱ्या पिठासह झटपट मिश्रणांवर जीएसटी आकारण्यात येणार आहे.

याबाबत इडली, डोसा आणि खमण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट फ्लोअर मिक्सवर लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा करावर एक महत्त्वाचे स्पष्टीकरण आले आहे. ज्यात इडली, डोसा आणि खमणमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिठासह झटपट मिश्रणांना छटुआ किंवा सत्तू म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर – १८ टक्के जीएसटी लावावा, असे गुजरात ऍडव्हान्स रुलिंग अपील ऍथॉरिटीने (जीएएआर) स्पष्ट केले आहे. परिणामी इन्स्टंट – फ्लोअर मिक्सवर ५ टक्क्यांऐवजी – १८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काळात इडली, डोशाचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुजरातस्थित किचन एक्स्प्रेस ओव्हरसीज लिमिटेड हि कंपनी खमण, डाळवडा, दहीवडा, ढोकळा, इडली आणि डोसा यांच्या पिठाचे मिश्रण पावडर स्वरूपात विकते. या कंपीनीने जीएसटी प्रगत प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात एएएआरशी संपर्क साधला होता. किचन एक्स्प्रेसने सांगितले की, त्यांचे सात ‘इन्स्टंट फ्लोअर मिक्स’ ‘रेडी टू इट’ प्रकारातले नाहीत, कारण ते काही स्वयंपाक प्रक्रियेतून जातात. या प्रकरणात त्यांना ‘रेडी टू कूक’ म्हणता येईल. किचन एक्स्प्रेसचा युक्तिवाद असा होता की, ते सत्तूसारखेच आहे आणि त्यावर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लावावा. पण, गुजरात ऍडव्हान्स रुलिंग अपील ऍथॉरिटीने जे घटक ‘इन्स्टंट फ्लोअर मिक्स’ बनवतात, ते सत्तूच्या बाबतीत संबंधित जीएसटी नियमांतर्गत समाविष्ट नाहीत, असे स्पष्ट करत अपीलकर्त्याचा युक्तिवाद नाकारला.
सीबीआयसीच्या परिपत्रकानुसार, सत्तू बनवण्यासाठी कमी प्रमाणात समाविष्ट केलेले घटक जीएसटी नियमांमध्ये ५ टक्के करदरासाठी पात्र आहेत. हे स्पष्टीकरण सध्याच्या प्रकरणात लागू नाही, कारण अपीलकर्त्याने पुरवलेल्या उत्पाद‌नांमध्ये इतर घटकांसह मसाले असतात. ‘सत्तू’च्या बाबतीत असे नाही, असे गुजरात ऍडव्हान्स रुलिंग अपील ऍथॉरिटीने म्हटले आहे. अपील प्राधिकरणाने असेही म्हटले आहे की, अंतिम ग्राहकांना झटपट मिक्स पीठ शिजवण्यासाठी काही तयारी करावी लागेल. पण, झटपट मिक्स पिठावर १८ टक्के जीएसटी लागू करू नये, असे म्हणण्याचा हा एकच आधार असू शकत नाही.आता सर्वसामान्याना नाष्टा करणे देखील महाग होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News