Ahmednagar News : चार शिक्षक साईदर्शनाला आले, भीषण अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
accident

Ahmednagar News : अहमदनगरमधील अपघाताची मालिका संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. काही घटना ताजा असतानाच आता साई दर्शनासाठी आलेल्या शिक्षकाचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात एकाच मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे.

शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या परराज्यातील शिक्षकाचा भरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातून साई दर्शनासाठी ३ जुन रोजी शिक्षक मध्यरात्री आले होते. आलेल्या शिक्षकांपैकी दोन शिक्षक चारचाकी वाहन शासकीय गेस्ट हाऊसजवळ लावून दोघे जण गाडीत बसले होते.

तर शिवचरण मलेश आप्पा (वय ५४) व त्यांचा मित्र मोहन जाधव हे दोघे रोडवरून रूम बघण्यासाठी जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या हिरो होंडा शाइन (एम एच २० जी ८०४४) या दुचाकीने मागून धडक दिल्याने मोठा रक्तस्राव होऊन शिवचरण मलेश आप्पा (वय ५४) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची फिर्याद मोहन जाधव (विजयनगर, कर्नाटक) यांनी शिर्डी पोलिसांत दिली.

या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी दुचाकी चालक मनोज सुरेश लाड याच्या विरोधात मयत शिक्षकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. दुचाकीवर दोन तरुण होते,

हे दोघे भरधाव वेगाने शिर्डीकडे येत असताना हा अपघात झाला आणि एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या बरोबर आलेल्या तीन शिक्षकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. मयत शिक्षकास स्थानिक नागरिकांच्या मदतीतून साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याची वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe