Ahmednagar News : विद्यार्थीनीस अश्लिल संदेश असलेली वही देणे, वर्गात धोकादायक हत्यार.. शिक्षक निलंबित, अहमदनगरमधील घटना

Pragati
Published:
zp

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून शिक्षण विभागाशी निगडित एक महत्वाचे वृत्त आले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गावातील अल्पवयीन विद्यार्थीनीस अश्लिल संदेश असलेली वही देणे, वर्गात धोकादायक हत्यार सापडणे,

पालकांशी तसेच सहशिक्षकांशी वाद घालणे, शालेय वेळेत मोबाईलवर गेम खेळणे इत्यादी प्रकारचे गैरवर्तन केल्याप्रकरणी खांडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील खांडगाव जिल्हा परिषद शाळेत गणपत जानकू सुकटे हे कार्यरत असताना त्यांच्यावर विविध आरोप ठेवण्यात आलेले आहेत.

यामध्ये वर्गात धोकादायक हत्यार सापडणे, पालकांशी तसेच सहशिक्षकांशी वाद घालणे, स्वतः चे वर्गात अश्लिल मजकूर असलेले भेटकार्ड वही प्राप्त होणे, इत्यादी प्रकारची तक्रार जिल्हा परिषदेपर्यंत पोहच झाली होती. याप्रकरणी प्रशासनाने आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी केली होती.

त्या अहवालात सत्यता आढळल्याचे समजले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी संबंधित उपाध्यापक शिक्षक सुकटे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच त्यांना जामखेड पंचायत समिती हे मुख्यालय देण्यात आले आहे.

शिक्षकी पेशाला कलंक लावणारे हे आरोप असल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान नुकतेच एक मुख्याध्यापकाने लाच घेतल्याचा प्रकार समोर आला होता. धनराज सखाराम सोनवणे, (वय -55 वर्ष मुख्याध्यापक, रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज ता. केज जि.बीड रा.सारणी आनंदगाव ता. केज जी.बीड (वर्ग -3)) असे या मुख्याध्यापकाचे नाव होते.

12 वी पास चा शाळा सोडल्याचा दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 3000 रू. लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून 3000 रू. लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe