अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- ना खुषीनेच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मोठ्या कालावधीनंतर नगरला येत आहेत.
१ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्यासाठी त्यांचा हा जिल्हा दौरा आहे. आपल्याकडे या पदाची जबाबदारी नको, असे त्यांनी पूर्वीच पक्षाला कळविले आहे.

त्यानंतर केवळ झेंडावंदन आणि आवश्यक बैठकांच्यावेळी ते नगरला येत असल्याचे दिसून येते. यावेळीही ३० एप्रिलला ते नगरला येत आहे.
दुपारी ३ वाजता ते नगर शहरात येतील. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप नियोजन बैठक होईल. त्यानंतर ते पारनेर तालुक्यात आमदार निलेश लंके यांनी आयोजित केलेल्या शाळा खोल्यांचे उद्घाटन आणि शिक्षक मेळाव्यासाठी जाणार आहेत. रात्री नगरमध्ये मुक्काम.
१ मे रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारा कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन करून साडेआठ वाजता पुण्याकडे रवाना होणार आहेत