Ahmednagar News : शेवगावातला शेअर्सच्या नावाखाली पैसे घेऊन पळालेला पकडला, पिस्तूल घेऊन फिरत होता..

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमधील शेअर्स मार्केटच्या नावाखाली झालेली कोट्यवधींची फसवणूक हा विषय राज्यभर चर्चिला गेला. शेवगावमधून अनेक जण असा पैसे गोळा करून पळून गेले आहेत. दरम्यान यातील एक जण पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

पोलिसांच्या अंगझडती दरम्यान एका युवकाकडे गावठी पिस्तूल व जिवंत तीन काडतूसे मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली व हाच तो पसार झालेला आरोपी असल्याचे लक्षात आले. अधिक माहिती अशी : रविवारी (९ जून) रात्री साडेनऊच्या सुमारास गदेवाडी फाटा, खानापूर (ता. शेवगाव) येथे पोलिसांच्या अंगझडती दरम्यान एका युवकाकडे गावठी पिस्तूल व जिवंत तीन काडतूसे मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली.

अक्षय अशोक इंगळे (रा. गदेवाडी) असे या तरुणाचे नाव असून, त्यानेच शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले. याबाबत पोलिस नाईक बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

खानापूर येथील गदेवाडी फाट्यावर एक युवक उभा असून, त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खबर गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांच्या पथकाने दोन पंचांसह खानापूर गाठले. तेथे उभ्या असलेल्या अक्षय इंगळे याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल,

तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत काडतूसे मिळून आली. त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, या आरोपीने शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांकडून ठेवी गोळा केल्या होत्या. लोकांचे पैसे घेऊन तो पसार झाला होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेकांनी शेवगाव पोलिसांकडे केली होती.

मात्र, त्याच वेळी बेकायदा गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली. दरम्यान आता यातून शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी आणखी काही धागेदोरे लागतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News