Ahmednagar News : पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून एका इसमाचे अपहरण झाल्याची घटना अहमदनगरमधून समोर आली आहे. ही घटना कोपरगाव मध्ये घडली असून हे वृत्त समजताच कोपरगावकरांमध्ये खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यासह पैसे दुप्पट करण्याच्या अमिशाला बळी पडणे व पाडणे दोन्हीकडील मंडळींना महागात पडले आहे. याप्रकरणी तब्बल ६ जणांना तरुंगाची हवा खावी लागणार असल्याचे चित्र आहे.

याप्रकरणी जानेफळ (ता. मेहकर, जि. बुलढाणा) पोलिसांकडून कोपरगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग झाला आहे. २२ जून रोजी अपहरणाच्या गुन्ह्यातून ही एक संपूर्ण सिनेस्टाईल घटना समोर आली आहे. फिर्यादी महिला ज्योती इंगळे (वय ३५, रा. इंदिरानगर (मूळ रा. मेहकर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
माझा पती पैशाचा पाऊस पाडण्याचे काम करतो असे फिर्यादी ज्योती इंगळे यांनी म्हटले आहे. २२ जून रोजी रात्री कोकमठाण (ता. कोपरगाव) जवळ अमोल जयसिंग रजपूतसह इतर चार ते पाच (रा. जानेफळ) व फिर्यादीचा पती दिलीप भिकाजी इंगळे (वय ४५) पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आले.
यातील आरोपींनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून पती दिलीप इंगळे यांचे अपहरण केल्याची फिर्याद मेहकर पोलिस स्टेशनला दिली. बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील दिलीप भिकाजी इंगळे (४५, रा. इंदिरानगर, जानेफळ, जि. बुलढाणा) याने अमोल जयसिंग राजपूत (रा. जानेफळ) यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविले.
पैशाचा पाऊस पाडण्यासाठी दिलीप इंगळेसह अमोल जयसिंग राजपूत व इतर चार-पाचजण असे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात आले. आरोपींनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरुन त्याचे अपहरण करुन पांढऱ्या रंगाच्या ट्रिबेर कारमधून २२ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते कोकमठाण शिवारातून निघून गेले अशी माहिती समजली आहे.
दरम्यान, अपहरण केल्याची फिर्याद मेहकर पोलिस स्टेशनला दिली. हा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात वर्ग झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.