अहमदनगरला आज-उद्या अतिवृष्टीचा इशारा,विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्याचीही शक्यता

Published on -

Ahmednagar News : जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी (दि. ९ व १०) विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जनतेने दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री नगर शहरासह परिसरात पावसाला सुरवात झाली. तसेच पाथर्डी, तसेच जामखेड परिसरातही पाऊस झाला. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात बहुतांश भागात मंगळवारी व बुधवारी वादळी वारे

आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात काही भागात अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.

डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात बहुतांश भागात मंगळवारी व बुधवारी वादळी वारे

आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात काही भागात अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पाथर्डीत जोरदार
पाथर्डी शहरासह परिसरात सोमवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती अखेर आज पावसाने चांगली बॅटिंग केली. सुमारे एक तासाहून अधिक पाऊस सुरू होता. शहरात झालेल्या पावसाने सकल भागात सर्वत्र पाणी साचले होते.

रात्री सुरू झालेल्या पावसामुळे व्यवसायिकांना दुकानावरून घरी जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावा लागली. पाथर्डी शहरात चांगला पाऊस झाल्याने दुचाकी व पायी जाणाऱ्या नागरिकांना अडकून बसावे लागेल. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात सर्व दूर तालुक्यात पाऊस सोमवारी रात्री बरसला.

सकाळपासून वातावरणामध्ये उकडा निर्माण झाले होते. खर्डे, दुले चांदगाव, साकेगाव माळी बाभुळगाव, धामणगाव, मढी, शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी, हंडाळवाडी, कारेगाव, मोहटा, करोडी, भिलवडे त्याचप्रमाणे माणिकदौंडी परिसरात चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe