Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ प्रकरणात स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी घातले लक्ष, ‘त्यांच्या’वर होणार मोठी कारवाई

शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका व्यवसाय सुरू असल्याची तक्रार संगमनेर शहरातील एका व्यक्तीने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली. केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या गृह खात्याकडे योग्य कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

Pragati
Published:
shaha

Ahmednagar News : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका व्यवसाय सुरू असल्याची तक्रार संगमनेर शहरातील एका व्यक्तीने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली. केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या गृह खात्याकडे योग्य कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आता लवकरच मटका मालकांवर कारवाई होणार असल्याचे समजते. संगमनेर शहरात तसेच तालुक्यात अवैध मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावर स्थानिक प्रशासनाला वारंवार तक्रारी देऊनही तक्रारीची दखल घेतली नसल्याने शेवटी हताश झालेल्या तक्रारदाराने थेट

दिल्ली येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच ई-मेलद्वारे स्थानिक प्रशासनाच्या आशीवार्दाने सुरू असलेला अवैध धंद्याची पोलखोल करून त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध मटक्याचे धंदे खुलेआम सुरू असून तक्रारदाराने कंट्रोल ११२ व स्थानिक गुन्हे शाखा यांना अनेक वेळा कळूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असे समजते. या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अवैद्य धंद्यावाल्यांना पाठीशी घातल्याचे दिसत आहे.

पोलीस निरीक्षकाच्या मर्जीतील कर्मचारी हा तालुक्याच्या हद्दीतून अवैध मटक्याच्या टपऱ्यांची रक्कम ठरवून घेत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्याचा कोणताही कर्मचारी हा तळेगाव दिघे, निमोण, वडगाव पान, मेढवन, धांदरफळ बु, निमज या ठिकाणी गेला नसून ११२ चा कॉल आल्यानंतर संगमनेर शहरातील २ इसमांवर खोटी कारवाई दाखविण्यात आली आहे.

एकावर वडगावपानची कारवाई तर दुसऱ्यावर तळेगाव दिघेची कारवाई दाखवली आहे. याची चौकशी करून अहवाल मिळावा, अशी विनंतीही तक्रारदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.

अवैध मटक्याचे व्यवसाय बंद न झाल्यास व सर्व अधिकारी व मर्जीतल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या दालनाच्या बाहेर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही तक्रारदाराने दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe