Ahmednagar News : अहमदनगरमध्ये एसटी व कारचा भीषण अपघात, दोघे ठार, तिघे गंभीर

Ahmednagarlive24 office
Published:
apghat

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एसटी व कारच्या भीषण अपघाताचे वृत्त आले आहे. एसटी बस व शेरोलेट बीट कार यांच्यात जोरदार धडक झाली असून यात दोघे ठार झाले आहेत तर नगरमधील तिघे गंभीर जखमी असल्याची माहिती समजली आहे.

हा अपघात जामखेड तालुक्यातील जामखेड खर्डा मार्गावर बटेवाडी शिवारात झाला आहे. अधिक माहिती अशी : जामखेडकडून खर्डा कडे निघालेली बस खर्डा कडून जामखेड कडे येणाऱ्या शेरोलेट बीट कारवर आदळली. या धडकेमुळे कार मधील पाच जण जखमी झाले

. त्यातील तिघे गंभीर जखमी असल्याने त्यांना तेथीलच एका हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करून नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. विजय गंगाधर गव्हाणे (वय २४ वर्षे), पंकज सुरेश तांबे (वय २४ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर मयूर संतोष कोळी (वय 18 वर्षे) हे गंभीर जखमी आहेत.

इतर जखमींना जामखेड येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयूर संतोष कोळी (वय १८), सचिन दिलीप गीते व अमोल बबन डोंगरे सर्व राहणार वडगाव गुप्ता अशी जखमींची नावे आहेत.

अपघातग्रस्त ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली असून पोलीस हवालदार कदम व इंगळे हे पंचनामे करण्यासाठी गेले आहेत. यातील एसटी चालकास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समजली आहे. पोलीस अधिक तपास करत असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करतायेत. पोलीस अधिकाऱ्यांचे पथकही घटनास्थळी जाऊन पाहणी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe