अहमदनगरमधील ‘त्या’ सराईत गुन्हेगाराचा खून कसा झाला? २४ तासांत छडा, त्याच्या सहकाऱ्यांनी केले ‘असे’ काही अन सपसप खुपसवले..

अहमदनगर जिल्ह्यातील खून, महिलांवर अत्याचारासह अनेक गुन्हे असणाऱ्या राहाता तालुक्यातील लोणी येथील सराईत गुन्हेगार उमेश नागरे याची हत्या झाली. या सराईत गुन्हेगाराचा भयंकर अंत झाल्याची घटना घडली. धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आता या सराईत गुन्हेगार उमेश नागरे याची हत्या त्याच्या तीन साथीदारांनी पैशाच्या देवाण घेवाणीतून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील खून, महिलांवर अत्याचारासह अनेक गुन्हे असणाऱ्या राहाता तालुक्यातील लोणी येथील सराईत गुन्हेगार उमेश नागरे याची हत्या झाली. या सराईत गुन्हेगाराचा भयंकर अंत झाल्याची घटना घडली.

धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आता या सराईत गुन्हेगार उमेश नागरे याची हत्या त्याच्या तीन साथीदारांनी पैशाच्या देवाण घेवाणीतून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मध्यप्रदेश पोलिसांनी २४ तासांत घटनेचा तपास करून तीन आरोपींना अटक केली. अटक केलेले तिन्ही आरोपी तालुक्यातील कोल्हार येथील रहिवासी असून ते मृत उमेश नागरेचे जोडीदार होते. उमेशच्या त्रासाला कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

अकिल नबाब शेख, अन्सार अल्लाउद्दीन पिंजारी व अमजद रशीद (तिघेही रा. कोल्हार, ता. राहाता) असे मध्य प्रदेशमधील खरगोण पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.  अजमेरहून दर्शन करून महाराष्ट्राकडे येत असताना खरगोण व बडवानी जिल्ह्याच्या सीमेवर उमेश नागरे याची शुक्रवारी पहाटे

अज्ञात चार लोकांनी हत्या केल्याचे नागरे यांचा वाहनचालक अकिल याने पोलिसांना सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली, वेगवेगळी उत्तरे मिळाल्याने संशय बळावला. कसून चौकशी केली असता नागरे याची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.

खरगोणचे पोलीस अधीक्षक धर्मराज मीना. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोहर सिंग बारिया, उपविभागीय अधिकारी अनुभाग मंडलेश्वर, मनोहर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बलकवाडाचे निरीक्षक रामेश्वर ठाकूर यांच्या पथकाने २४ तासांत तपास पूर्ण केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe