Ahmednagar News : नुकतेच पतीचे निधन, आता मुलाच्या किडन्या निकामी, आजी किडनी देतेय पण दवाखान्यासाठी पैसे नाही, आईची मदतीसाठी आर्त हाक

Ahmednagar News

Ahmednagar News : पती- पत्नी उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही..पती ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकवर काम करायचा..दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन..अन आता पोटच्या मुलाच्या दोन्ही किडन्या झाल्या निकामी..आजी किडनी द्यायला तयार झाली..पण..ते बदलायला येणारा मोठा खर्च तो झेपणारा नाही..ही कहाणी आहे अहमदनगरमधील..

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील एका आईने बारावीत शिकणाऱ्या मुलाच्या किडन्या बदलण्यासाठी मदतीची आर्त हाक दिली आहे. तारा भाऊसाहेब घुगरे असे आईचे नाव असून, अभिषेक घुगरे असे मुलाचे नाव आहे.

कोरडगाव येथील भाऊसाहेब घुगरे, तारा घुगरे हे पती- पत्नी उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नसल्याने भाऊसाहेब घुगरे परगावी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकवर काम करत होते. पत्नी घर सांभाळून दोन मुलांचा उदरनिर्वाह करत होती.

साधारण दोन वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा अभिषेक अचानक आजारी पडला. पती गेल्यानंतर मोठे संकट उभे राहिले.

त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. डॉ. सुहास बाविकर यांनी अभिषेकला एक तरी किडनी बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

त्यानंतर आईच्या आईने (आजी) गयाबाई नजन (६३) यांनी नातवाला किडनी देऊ केली. अभिषेकची एक किडनी बदलण्याचा निर्णय तारा घुगरे यांनी घेतला. किडनी बदलण्यासाठी किमान पंधरा ते सोळा लाख रुपये खर्च रुग्णालयाकडून सांगण्यात आला.

मुलाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. त्यामुळे मुलाची किडनी बदलण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन तारा घुगरे यांनी केले आहे. आर्थिक मदत पाठविण्यासाठी ७८२३०३२०४६ (गुगल पे, फोन पे) हा क्रमांक दिला आहे. यावर आत मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe