Ahmednagar News : पती शेतात गेला, नराधम रात्री खोलीत शिरला, चाकूचा धाक दाखवत विवाहितेवर अत्याचार

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्वेकडील एका गावात एका तरुणाने घरच्या वरील जिन्याच्या साह्याने घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला. त्यानंतर पीडितेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्वेकडील एका गावात एका महिला आपल्या कुटुंबासोबत राहून शेतीवर आपली उपजीविका करत आहे.

दि. २७ एप्रिल रोजी तीचे पती शेतातील ट्रक्टरचे साहाय्याने शेत नांगरणी करीता रात्री ११ च्या सुमारास गेले असता पीडित महिला आपल्या मुलासोबत घरात झोपली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी संदेश रमेश भोसले (रा. आढळगाव) हा घरावरून वरील जिन्याने हातात चाकू घेऊन घरात आला.

त्यानंतर पीडितेच्या जवळ गेला. त्यावेळी पीडित विवाहित महिला झोपेतुन उठली. त्यावेळी आरोपीने पीडितेला धमकावले. तिला व मुलाला चाकुने ठार मारेन अशी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.

घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित विवाहित महिला आणि तिच्या मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यावेळी पीडित महिलेने आरडा-ओरड केली. त्यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकुण बाहेर झोपलेले पळत घरात आले.

त्यावेळेस आरोपी संदेश रमेश भोसले हा त्याच घराच्या वरील जिन्याने पसार झाला. त्यावेळी पीडितेने घडलेला प्रकार घरातील लोकांना सांगितला. पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असून अत्याचारासह, विनयभंग, छेडछाड आदी घटना देखील घडत आहेत. दोनच दिवसापूर्वी नगर शहरात राहणाऱ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून इमामपूर घाटातील लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe