अहमदनगरमध्ये कोठे मुसळधार तर कोठे ढगफुटीसदृश, सीनालाही पूर

अहमदनगर जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्टला जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी रात्रभर पाऊस सुरु होता. अहमदनगरमध्ये कोठे मुसळधार तर कोठे ढगफुटीसदृश पाऊस झाला.

pavus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात २२ व २३ ऑगस्टला जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी रात्रभर पाऊस सुरु होता. अहमदनगरमध्ये कोठे मुसळधार तर कोठे ढगफुटीसदृश पाऊस झाला.

नगर
नगर शहररासह ग्रामीण भागात पाऊसाने चांगलेच झोडपले. जेऊर, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, नेप्ती, एमआयडीसी आदी भाग पावसाने चांगलाच झोडपला.

त्यामुळे सीना नदीला दुथडी भरून पाणी वाहत होते. कल्याण-नगर मार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी चालल्याने थांबवली गेली होती.

अकोले
आढळा खोऱ्यातील सांगवी, खिरविरे, एकदरा, वखारी, पाडोशी, चंदगिरवाडी, बिताका या गावांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश पावसाने अक्षरशः दाणादाण उडविल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

अकोले तालुक्यातील आढळा खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पावसाने दाणादाण उडविली. सांगवी, खिरविरे, एकदरा, वखारी, पाडोशी, चंदगिरवाडी, बिताका या गावांमधील भात, सोयाबीन व बाजरीची पिके अक्षरशः नेस्तनाबूत झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार सदाशिव लोखंडे व बाजीराव दराडे यांच्या माध्यमातून खास बाब म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन जि. प. सदस्या सुषमा दराडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे विजेच्या कडकडाटासह ४ इंच मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने ओढे, नाले वाहू लागले आहे. तसेच शेतातील उभ्या पिकात पाणी साचले तर काही शेतकऱ्यांचे ऊस, मका ही उभी पिके भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

टाकळीभान येथे गुरूवारी रात्री तीन तास जोरदार पाऊस झाला आहे. पर्जन्य मापकावर या पावसाची १०० मी.मी नोंद झाली आहे. या झालेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

कपाशी, तूर, सोयाबिन, ऊस या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ओढे, नाले वाहू लागले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe