Ahmednagar News : संकटात आहात? ११२ डायल करा करा ! १४ मिनिटांत मिळते मदत

Ahmednagarlive24 office
Published:

डायल ११२ ही सुविधा अडचणीतील नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेद्वारे आजवर हजारो लोकांना तात्काळ मदत मिळाली आहे. अडचणीतील लोकांना पोलिसांकडून मदत पोहोचविण्यात येते व संकट निवारण करण्यात येते.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मागील अकरा महिन्यात डायल ११२ वर ४७ हजार कॉल आले होते व विशेष म्हणजे हे सर्व कॉल पूर्ण करण्यात आले आहेत. या सर्व तक्रारदारांना सरासरी १४ मिनिटात मदत पोहोच झाली आहे. मागील अकरा महिन्यांचा जर विचार केला तर डायल ११२ वर ४७ हजार कॉल पूर्ण करणे हे खर्च कौतुकास्पदच आहे.

 काय आहे डायल ११२ :-सामान्य नागरिकांना काही अडचण आली किंवा सुरक्षेच्यादृष्टीने काही संकट निर्माण झाले तर पोलिसांची तात्काळ मदत मिळावी हा उद्देश डायल ११२ चा आहे. आपत्कालीन स्थितीत पोलिसांची मदत हवी असल्यास तत्काळ डायल ११२ वर कॉल करा.

त्यानंतर लगेच संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी मदतीसाठी दाखल होतील. या हेल्पलाइनची मदत घेणाऱ्यांची संख्या ग्रामीण भागातून वाढत आहे. डायल ११२ साठी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला गेला आहे. त्यामुळे मदत मिळणे आणखी सोपे होते. आजवर कॉल करणाऱ्याना सरासरी १४ मिनिटात मदत दाखल झालेली आहे.

 अशी आहे सिस्टीम :- डायल ११२ द्वारे मदत लवकर पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील ५३ मोटारसायकलवर व ४३ चारचाकी वाहनांवर एमडीटी यंत्र बसविण्यात आले आहे. कॉल येताच नियंत्रण कक्षातून पोलिस ठाण्यांना माहिती दिली जाते. त्यानंतर तत्काळ मदत पाठवली जाते. व कॉल करणाऱ्याना मदत प्राप्त होते.

 महिलांसाठी ठरतेय वरदान :- डायल ११२ वर सर्वाधिक ११ हजार तक्रारी महिलांच्या विषयीच्या अपराधाविषयी आलेल्या आहेत. यात महिलांच्या छेडछाडीच्या २८६ तक्रारी आहेत. महिलांसाठी डायल ११२ ही वरदान ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe