Ahmednagar News : हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून नगर शहरातील गुन्हेगारी वाढतेय? गाडे-कोतकर यांच्यावरील दाखल गुन्ह्यानंतर ‘या’ चर्चांना उधाण..

अहमदनगर जिल्ह्यातील तथा शहरातील राजकारण हे काळानुसार बदलू लागले आहे. दरम्यान अनेक राजकीय व्यक्ती या विविध व्यवसायात देखील उतरलेल्या आहेत. दरम्यान नुकत्याच घडलेल्या काही घटनांनंतर हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून नगर शहरातील गुन्हेगारी वाढतेय का अशा चर्चांना उधाण आले.

Pragati
Published:
crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील तथा शहरातील राजकारण हे काळानुसार बदलू लागले आहे. दरम्यान अनेक राजकीय व्यक्ती या विविध व्यवसायात देखील उतरलेल्या आहेत. दरम्यान नुकत्याच घडलेल्या काही घटनांनंतर हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून नगर शहरातील गुन्हेगारी वाढतेय का अशा चर्चांना उधाण आले.

नगर शहरात हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. तर हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

हे दाखल झालेले गुन्हे हॉटेल संदर्भात कामगारांवरून झाल्याचे दिसते. नेमके काय घडलेय ते आधी आपण पाहू, त्यासाठी घडलेल्या धक्कादायक चार घटना पाहुयात..

हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ‘तू हॉटेल यश पॅलेस येथे काम करायचे नाही, अन्यथा तुला नगरमध्ये राहू देणार नाही, जीवंत सोडणार नाही,’ अशी धमकी देत सचिन कोतकर याच्या सांगण्यावरून आठ ते दहा जणांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राकेशकुमार रामनारायण सिंग (वय ४५, रा. नंदकिशोर रेसिडेन्सी, वडगाव गुप्ता रोड, नागापूर) असे मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

राकेशकुमार हे पूर्वी उदयनराजे पॅलेस येथे मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. मात्र, त्यांनी ही नोकरी सोडून यश पॅलेस येथे नोकरी सुरू केली. तेव्हापासून उदयनराजे पॅलेसचा मालक सचिन कोतकर हा त्यांना ‘तू आमच्या समोर हॉटेल यश पॅलेस येथे काम करू नकोस, तू इतर कोठेही काम कर,’ असे म्हणत दमदाटी करत होता.

त्याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. घराकडे जात असताना सचिन कोतकर याच्या सांगण्यावरून रोशनकुमार मिश्रा ऊर्फ राजन कुमार, प्रिन्स कुमार सिंग, नीरज कुमार, अमन श्रीकांतसिंग, सुनीलकुमार सिंग, हनुमान रामदास झरेकर व ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी दमदाटी करत ‘तुला नगरमध्ये राहू देणार नाही, तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत फिर्यादीने म्हटले आहे.

दरम्यान हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये प्रिन्स कुमार हरी नारायण सिंग यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की,

नगर शहरातील हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे व राकेश सिंग यांनी मला एका नम्बरवरून कॉल करून तू उदयनराजे पॅलेसलाच का कामाला गेला अशी विचारणा करत शिवीगाळ केली. हे काम सोडून नगर सोडून जा अन्यथा तुझ्यासह तुझ्या मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवू असे फिर्यादीत म्हटले आहे.

आता पारनेरमधील काल अर्थात मंगळवारी रात्री १२ वाजता घडलेली घटना पाहू. निघोज – वडगाव रस्त्यावर हॉटेल जत्रा आहे. मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास यावेळी दारूच्या नशेत असणाऱ्या पाच ते सात लोकांनी मालक प्रदीप भुकन यांच्यावर तलवार,

कोयता यांच्या साहाय्याने वार केले. यात त्यांच्या हातावर आणि पायावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. काही दिवसांपूर्वी सारोळा कासार येथे देखील एका हॉटेलचालकावर हल्ला झाल्याचे ऐकिवात आले होते.

गुन्हेगारी वाढतेय का?
आता या घटना पहिल्या तर हॉटेल व्यवसायाच्या स्पर्धेतून किंवा हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून नगर शहरातील गुन्हेगारी वाढतेय का असा प्रश्न नागरिक करत आहेत.

स्पर्धा असावी पण ती निकोप असावी किंवा तिला राजकीय वास असू नये. पण ही स्पर्धा नगर शहरास जिल्ह्यात आता जीवघेणी बनत चाललीय का? असा सवाल नागरिक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe