पूर्वेकडून सुरवात झालीये त्यामुळे,.. अहमदनगरसह ‘या’ पाच जिल्ह्यात ‘इतका’ पडेल पाऊस, डॉ. पंजाबराव डख यांनी स्पष्टच सांगितलं..

सध्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्र चांगला बरसला. दरम्यान आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या नजर पुन्हा आभाळाकडे गेल्या आहेत. दरम्यान आता पाऊस कधी व कसा पडेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Published on -

Ahmednagar News : सध्या अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मृग नक्षत्र चांगला बरसला. दरम्यान आता पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या नजर पुन्हा आभाळाकडे गेल्या आहेत.

दरम्यान आता पाऊस कधी व कसा पडेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता डॉ. पंजाबराव डख यांनी याबाबत अंदाज मांडला आहे. ज्या ज्या वेळी पूर्वेकडून पाऊस येतो, त्या वेळी नगरसह बीड, लातूर, सोलापूर आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये हमखासपणे समाधानकारक पाऊस होतो.

त्यामुळे यावर्षी देखील पावसाने पूर्वेकडून सुरुवात केल्यामुळे वरील पाचही जिल्ह्यांमध्ये यावर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची वार्ता असून, यंदा भरपूर पाऊस या पाच जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे संकेत हवामानाचे अभ्यासक डॉ. पंजाबराव डख यांनी दिले.

परभणीकडून पुण्याकडे जात असताना सोमवारी (दि. १) सकाळी डॉ. डख करंजी येथे शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव चहा पिण्यासाठी थांबले होते. या वेळी शेतकऱ्यांसोबत झालेल्या चाय पे चर्चा प्रसंगी पंजाबराव यांनी शेतकऱ्यांशी मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या.

या वेळी माजी चेअरमन अशोक अकोलकर, उपसरपंच सुनील अकोलकर, सेवा संस्थेचे संचालक सुभाष अकोलकर, ज्येष्ठ नेते छगनराव क्षेत्रे, बाबासाहेब क्षेत्रे, सुधाकर अकोलकर, बाबासाहेब गाडेकर आदींसह अनेक मान्यवर आदी उपस्थित होते. डॉ. डख म्हणाले की, यंदा पावसाने पूर्वेकडून सुरुवात केल्यामुळे भरपूर पाऊस पडणार आहे.

काळजी करण्याचे काही कारण नाही. त्यामुळे दि. ४पासून ११पर्यंत भरपूर पाऊस होऊन नदी, नाले, बंधारे, पाझर तलाव ओसंडून वाहतील अशा शब्दांत डख यांनी पावसाचा अंदाज व्यक्त करताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाला. सरपंच रफिक शेख यांच्या हस्ते डख यांचा करंजी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News