अहमदनगरमध्ये शेतमजुरांना नेणारी जीप उलटली, एकाचा मृत्यू, १० महिला जखमी

अहमदनगरमधून अपघातासंदर्भात एक मोठे वृत्त आले आहे. शेतमजुरांना घेऊन चाललेला पिकअप जीप उलटून भीषण अपघात झालाय. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दहा-बारा महिला जखमी झाल्या आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
ahmednaagr

Ahmednagar News : अहमदनगरमधून अपघातासंदर्भात एक मोठे वृत्त आले आहे. शेतमजुरांना घेऊन चाललेला पिकअप जीप उलटून भीषण अपघात झालाय. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दहा-बारा महिला जखमी झाल्या आहेत.

हा अपघात पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या वरील चकेवाडी गावानजीक धोकादायक वळणावर झाला. भास्कर निवृत्ती शेळके (वय ४२, रा. माणिकदौंडी) असे मृताचे नाव आहे.

दहा ते बारा महिला व पुरुष मजूर शेतकामासाठी बुधवारी (दि. ७) सकाळी मालवाहतूक करणाऱ्या पिकअप जीपमधून माणिकदौंडी येथून पाथर्डीकडे जात होते. माणिकदौंडी गावापासून दोन किलोमीटरवर हे वाहन वळणावर उलटले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुहास गायकवाड, विजय काळोखे, सोमा घुगे घटनास्थळी गेले. दरम्यान, परिसरातील रहिवाशांनी जखमींना बाहेर काढून पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले.

त्यात एक पुरुष व आठ महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहमदनगर येथे पाठविण्यात आले. त्यातील भास्कर शेळके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी असलेल्या शमशाद जावेद शेख, मनीषा ज्ञानेश्वर शेळके,

प्राची राजू पगारे, हजराबी रसूल सय्यद, नायरा अकबर पठाण, सिंधू रमेश गायकवाड, अनिता एकनाथ शेळके, परवीन पठाण, अफसाना शेख (सर्व रा. माणिकदौंडी) यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या अपघातात आणखी तीन जण जखमी झाल्याची माहिती असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe