Ahmednagar News : विरोधकांनी विजय मिळाला म्हणून हुरळूण न जाता आमच्या कार्यकर्त्यांना दमबाजी त्रास देण्याचा प्रयत्न करू, नये आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही शांत संयमी स्वभावाचे आहोत, याचा विरोधकांनी वेगळा अर्थ घेऊ नये आमच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हाला आमचा स्वभाव बदलायला लावू नका, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला. तसेच माजीमंत्री कर्डिले यांना पुन्हा आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अहमदनगर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, या पराजयाने कोणीही खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने सर्वांनी एकोप्याने विकासकामासाठी पुढे यावे.
राज्यात व देशात महायुतीचे सरकार असल्यामुळे निश्चितपणे प्रत्येकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही.लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी प्रामाणिकपणे आपल्या वयाचाही विचार न करता माझ्या विजयासाठी खूप प्रयत्न केले.
त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे सहकार्य मात्र त्यांना यास आले नाही. मात्र जनतेच्या मनातच वेगळी लाट निर्माण झाली होती, त्यामुळे उगाच विरोधकांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्याची गरज नाही.
माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लोकसभा निवडणुकीत खूप धावपळ केली, परिश्रम घेतले, महायुतीच्या इतर सर्वच नेते मंडळींनी व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आहेत, तेदेखील मी विसरणार नाही; परंतु माजी मंत्री कर्डिले यांना पुन्हा आमदार करून त्यांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टातून थोडीशी उतराई होण्याचा प्रयत्न करू.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या ज्या उमेदवारांना माझी गरज पडेल, त्यांच्यासाठी निश्चितपणे निवडणुकीत सक्रिय राहून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यांनी सांगितले.