Ahmednagar News : शिर्डीमधून गुन्हेगारी संदर्भात एक वृत्त आले आहे. सहा जणांच्या टोळीने हातात कोयता घेऊन दहशत करून लूटमार केली आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. चेन, मोबाइल व खिशातील पैसे या टोळीने लुटून नेले आहेत.
शिर्डी भाजी मंडई जवळील भरवस्तीत एका हॉटेलवर ही घटना घडली असून घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे शिर्डीत दहशतीचे वातावरण तयार झाले असून शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविकांमध्ये ही भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
पोलिसांनी सीसीटिव्ही चित्रिकरणाच्या आधारे सहाही आरोपींना ओळखले असून हे आरोपी सराईत गुन्हेगार असून शिर्डीचे स्थानिक आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच शिर्डी पोलिसांच्या तीन टीम आरोपींचा शोध घेत आहेत.
शिर्डीत जुगार, गावठी कट्टा बाळगणे, दुचाकी, चारचाकी गंठण चोरीचे प्रकार सुरू आहेत. वाढत्या गुन्हेगारीला अवैध व्यवसाय कारणीभूत आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तत्काळ उपायोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शिर्डीत बुधवारी हॉटेल कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील चैन, मोबाईल व पैसे चोरून निले. याप्रकरणी शिर्डी पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात अशा पद्धतीच्या लुटमारीच्या घटना घडत आहेत. भर दिवसा घरफोडी होत आहेत. ग्रामीण भागातही चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी तातडीने अशा घटनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.