Ahmednagar News : शहरातील ६ कॅफे हाऊसला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चांगलाच दणका दिला. याशिवाय कॅफे हाऊसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्यांनाही चांगलीच समज दिली. ही कारवाई सोमवारी (दि.८) रात्री करण्यात आली.
एलसीबीच्या कारवाईमुळे बेकायदेशिररित्या कॅफे हाऊस चालविणाऱ्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच कॅफे हाऊसचा गैरवापर करणाऱ्या तरुण-तरुणींनीही चांगलाच धसका घेतला आहे. शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पार्टमेंट बनवून तरुण मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी मोबदला घेवुन जागा उपलब्ध केली जाते,
अशा तक्रारी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना प्राप्त झाली. त्यांनी तत्काळ एलसीबीच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ कॅफे हाऊसवर छापे टाकले. दोन पथकांनी ही कारवाई केली.
पथकाने सावेडी उपनगरातील श्रीराम चौक, पाईपलाईन रोड येथील लव्ह बर्डस कॅफे, कुष्ठधाम रोड येथील बाबाज कॅफे, गुलमोहर रोड येथील हर्षाज कॅफे, नगर-मनमाड रोडवरील कोहिनुर मॉल समोरील झेड के कॅफे, अहिंसा चौक, बुरुडगांव रोड,
इगलप्राईड कॉम्प्लेक्स मधील गोल्डरश कॅफे व चाणक्य चौकातील रिजकिंग कॅफेंवर कारवाई केली. त्या ठिकाणी तरुण मुले मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई. तुषार धाकराव, सोपान गोरे,
पोहेकॉ. संदीप पवार, अतुल लोटके, पोकॉ. सागर ससाणे, अमृत आढाव, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, जालिंदर माने, मपोहेकॉ. भाग्यश्री भिटे, मपोकॉ. सोनाली साठे, सफौ. उमाकांत गावडे, पोकॉ. अरुण यांनी केली.