अहमदनगरमधील मराठा चळवळीतील अग्रगण्य ‘त्या’ तरुणाचा वीज धक्क्याने मृत्यू

मनोज जरांगे पाटील हे सोमवारी १२ ऑगस्टला अहमदनगर जिल्ह्यात येणार आहेत. शांतता रॅली शहरातून निघणार आहे. परंतु त्याआधीच मराठा आरक्षण चळवळीतील एका तरुणाबाबत दुःखद बातमी आली आहे.

Published on -

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील हे सोमवारी १२ ऑगस्टला अहमदनगर जिल्ह्यात येणार आहेत. शांतता रॅली शहरातून निघणार आहे. परंतु त्याआधीच मराठा आरक्षण चळवळीतील एका तरुणाबाबत दुःखद बातमी आली आहे.

विजेचा धक्का बसून मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील भरत भगवान सूर्यवंशी (वय ३०) या तरुणाचे शुक्रवारी (दि. ९) सकाळी साडेदहा वाजता या विजेच्या धक्क्याने निधन झाले.

काल सकाळी आढळगाव येथे विजेचे काम करत असताना भरत सूर्यवंशी यांच्या हाताला विजेचा धक्का बसला. त्यांना तत्काळ श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सूर्यवंशी काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या चळवळीत काम करीत होते. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे तालुक्याच्या दौऱ्यावर आले

असताना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आढळगाव येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गव्हाणेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोमवारी मनोज जरांगे नगरमध्ये
मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी नगर शहरातून जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव येणार असल्याने शहरात मोठी गर्दी होणार आहे.

त्यामुळे शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांना एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. रविवारी पुणे शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे.

पुणे येथून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील बेलवंडीफाटा येथून सोमवारी नगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. तेथून ते पुणे रोडने केडगाव येथे येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe