अक्षरशः झोडपले ! अहमदनगरमधील ‘या’ तालुक्यात ८० मिमी पाऊस, धरणे फुल, नद्यांना पूर

अहमदनगर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह तालुक्याला पावसाने झोडपले आहे. सध्या दारणा धरण ९७ तर गंगापूर धरण ९३ टक्के भरले आहे. कोपरगावला ८० तर ब्राम्हणगावला ७३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
pvus

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव शहरासह तालुक्याला पावसाने झोडपले आहे. सध्या दारणा धरण ९७ तर गंगापूर धरण ९३ टक्के भरले आहे. कोपरगावला ८० तर ब्राम्हणगावला ७३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

शहरातील सखलभागासह उपनगरात साठलेले पाणी गोदावरी नदीतून १६ हजार क्युसेकने जायकवाडीकडे वाहते झाले आहे. कोपरगाव शहरासह तालुक्याला पावसाने झोडपुन काढले.

ब्राम्हणगावला ७३ तर कोपरगावला ८० मिलीमिटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसामुळे परिसरात कुठे मोठी हानी झाली की काय, याचा प्रशासन शोध घेत आहे. इगतपूरी आणि त्र्यंबकेश्वर येथील पाऊस प्रचंड होता.

गोदावरी नदी दुथडी भरून वाहु लागली आहे. धोत्रे परिसरात नुकत्याच झालेल्या अति पावसामुळे काही शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. रस्त्याच्या कडेची दोन-तीन झाडे मिळून पडले आहेत.

चारा कडवळ पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. निवासी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांच्या प्राथमिक माहितीनुसार नुकत्याच झालेल्या पावसामुळे कोकमठाण मंडळातील वारी, सडे गावात मागुबाई भालचंद्र पडघडमल यांची कट नंबर १०९ मधील विहीर पडली गेली.

कोपरगाव रवंदे, पोहेगाव, सुरेगाव मंडळात चांगला पाऊस झाला, मात्र नुकसान झाले नाही. नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १६ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले होते.

तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

८४ दिवसातील शुक्रवारचा पाऊस दणकेबाज होता. त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केल्याने शासनाचा कोटीच्या कोटी रूपयांचा महसुल अक्षरक्षः पावसाच्या पाण्यात वाहुन गेला आहे.

१ जून पासून ८४ दिवसांत नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून २ लाख १७ हजार ८३३ क्युसेक्स पाणी जायकवाडीकडे वाहुन गेले आहे. गारदा नाला तीन वर्षांपासून पहिल्यांदाच वाहू लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe