Ahmednagar News : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लागले विधानसभेच्या तयारीला; कार्यकर्त्यांना ‘या’ सूचना !

Pragati
Published:

Ahmednagar News : राजकारणआपला धंदा नाही, राजकारण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. आपला राजकीय प्रवास संघर्षमय आहे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहायचे आहे. टीका करणाऱ्यांना करू द्या. या तालुक्यामध्ये टीका करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा जुना धंदा आहे. येत्या विधानसभेचा आमदार हा महायुतीचा झाला पाहिजे, या इर्षेने कामाला लागा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीरामपूर तालुका व शहर भाजपाच्या वतीने मंत्री विखे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी प्रसंगी ते बोलत होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटलांपासून संघर्षमय प्रवास सुरू आहे. निवडणूकीदरम्यान काही घटना घडल्या, त्याचे मनावर घेतले नाही.

आपल्या नेत्याने आपल्याला लढायचे शिकवले आहे. पंडित नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळाला. कार्यकर्त्यांनी नाउमेद होऊ नये, राजकारणआपला धंदा नाही, राजकारण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. ज्या त्रुटी असतील त्या भविष्यात दुरुस्त करायच्या आहेत.

सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न आपण सोडवणार आहोत. तालुक्याचा विकास करताना खंडकरी शेतकऱ्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यात आपल्याला सर्वात मोठे यश आले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे. हे आपले सर्वांचे काम आहे.

श्रीरामपूरने महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य दिलेले आहे. दूध, कांदा असे अनेक शेतमालाचे प्रश्न असतील, याचा विरोधकांनी नकारात्मक प्रचार केला. संविधान, घटना बदलणार असे म्हणून मागासवर्गीय व अल्पसंख्यांकांमध्ये गैरसमज पसरविले. पुढील काळात श्रीरामपूरच्या एमआयडीसीमध्ये दोन मोठे प्रकल्प आणणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी भाजपाचे विधानसभा प्रभारी नितीन दिनकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, माजी सभापती नानासाहेब शिंदे, विठ्ठलराव राऊत, स्विकृत माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड, जाफ्राबादचे माजी सरपंच संदिप शेलार, चंद्रशेखर आगे, रामभाऊ लिप्टे, संदिप चव्हाण, रवि पाटील, भिमराज बागुल, गणेश मुदगुले, ऍड. प्रविण लिप्टे, दीपक चव्हाण, भाजपा युवा मार्चा तालुकाध्यक्ष शंतनु फोपसे, पुष्पलता हरदास, सतीश सौदागर, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, गिरीधर आसने, पोपटराव जाधव,

बाबासाहेब चिडे, इंद्रभान थोरात, नितीन भागडे,संतोष भागडे, नानासाहेब पवार, के. के आव्हाड, शंकर मुठे, सोनाली नाईकवाडी, मारूती बिगले, मंजुशा ढोकचौळे, पोपट जाधव, अभिषेक जाधव, अभिजीत पोटे, भाऊसाहेब बांद्रे, विठ्ठल राऊत, माजी पंचायत समिती सदस्या कल्याणी कानडे, सतीश कानडे, रामभाऊ लिपटे, पूजा कांबळे, महेंद्र पटारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe