अखेर मॉब लिंचिंग दाखल, अनेक गावकरी फरार, पांगरमलमध्ये शुकशुकाट..

शेळीचोर समजून ग्रावक-यांनी चौघांना केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. तालुक्यातील पांगरमल येथे गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री झालेल्या या घटनेनंतर सकाळी गावच्या सरपंचासह २५ ते ३० गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

Pragati
Published:
pangrmal

Ahmednagar News : शेळीचोर समजून ग्रावक-यांनी चौघांना केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. तालुक्यातील पांगरमल येथे गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री झालेल्या या घटनेनंतर सकाळी गावच्या सरपंचासह २५ ते ३० गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या दारूकांडानंतर गाजलेले पांगरमल मॉब लिंचिंगच्या ताज्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दारू प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता. विषारी दारूकांडात १३ जणांची प्रकृती गंभीर होती. आता पुन्हा एकदा हे गाव चर्चेत आलं आहे.

बुधवारी रात्री घडलेल्या मॉब लिंचिंगच्या गंभीर प्रकारामुळे पांगरमलच्या सरपंचासह सहा जणांना वे अटक झाली आहे. चोरीच्या संशयावरून आदिवासी कुटुंबाला मारहाण करण्यात आली. जमावाने हा गुन्हा केल्यामुळे घटनेतील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

घटनेत मयत झालेल्या चांगदेव नामदेव चव्हाण याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. इतर जखमींवर उपचार होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कारवाईच्या भीतीने गावातील अनेकजण पसार झाले आहेत. गावात गुरुवारी दिवसभर शुकशुकाट होता. पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत आहे.

आरोपींमध्ये सरपंच, माजी सरपंचही
पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाड आणि माजी सरपंच महादेव आव्हाड यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

अनेक तरुण पसार
गावातील अनेक तरुण अटकेच्या भीतीपोटी मोबाईल बंद करून पसार झाल्याचे चित्र गावात पाहावयास मिळत आहे. गावामध्ये शुकशुकाट दिसून येत असून सर्वत्र शांतता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe