Ahmednagar News : मॉन्सूनची प्रगती, नगर, बीडपर्यंत पावसाची मजल ! नगरमधील तीन मंडलात अतिवृष्टी, ‘या’ तारखेपर्यंत यलो अलर्ट

Published on -

Ahmednagar News : मॉन्सूनच्या प्रवाहाचा वेग कायमअसून रविवारी (ता. ९) मोसमी वाऱ्यांनी मुंबई, पुण्यासह ठाणे, नगर, बीडपर्यंतच्या भागात प्रगती केलीअसल्याचे दिसते. आता यंत्र अल्पवधीतच महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मॉन्सून प्रगती करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

यंदा मॉन्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असून केरळमध्ये दोन दिवस आधीच (३० मे) तर गुरुवारी (ता. ६) चार दिवस अगोदर महाराष्ट्रात दाखल झालाय. अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (ता. ८) सायंकाळी व रात्री अनेक भागात पाऊस पडला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक दिसत आहे.

५० महसूल मंडलांमध्ये समाधानकारक, तर तीन मंडलात अतिवृष्टी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरीराजा सुखावला आहे परंतु साधारण १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीकरू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

मान्सूनपूर्व पावसानंतर मागील दोन- तीन दिवसांपासून ढगांनी जिल्हा व्यापला आहे. सर्वदूर पाऊस होण्यास सुरूवात झाली असून विशेषतः दक्षिण भागात समाधानकारक पाऊस पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नगर-२३.६, पारनेर- १८.२, श्रीगोंदे- ४०.५, कर्जत- ५२.९, जामखेड – २७.६, शेवगाव-१७.६, पाथर्डी- २५.६, नेवासे-१.६, राहुरी- ३.३, संगमनेर १४.१, अकोले १९.४, कोपरगाव-१२.३, श्रीरामपूर-९, राहाता- १४.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तीन मंडलात अतिवृष्टी
जिल्ह्यातील तीन मंडलात अर्थात श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव (७१), कर्जत तालुक्यातील राशीन (७४) व भांबोरा (८२) महसूल मंडलात अतिवृष्टी झाली असल्याची माहिती समजली आहे.

९ जून ते १६ जून यलो अलर्ट
हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्याला ९ जून ते १६ जून या कालावधीत यलो अलर्ट दिलेला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. यापर्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील दिला गेलाय.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News