निवृत्त पोलिसाचा खून ! ‘ती’ महिला कोण? अहमदनगर हादरले

पंधरा दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच काल मारहाणीत सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

murder

Ahmednagar News : नगर मनमाड मार्गावर शिंगणापूर फाटा येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास ६८ वर्षीय सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुखदेव किसनराव गर्जे (रा. अकोले, जिल्हा, अहमदनगर) असे मयताचे नाव आहे.

शिंगणापूर फाटा येथे गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव गर्जे यांच्याबरोबर होते अशी चर्चा आहे. याचवेळी सखदेव गर्जे खाली पडले.

त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी हवालदार बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, राजेंद्र नागरगोजे, महिला पोलिस कर्मचारी कुसळकर आदींचे पथक ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

दरम्यान, पोलिस पथकाने एक महिला व तिच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत उपस्थितांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. गर्जे यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच समजेल, असे राहुरी पोलिसांनी सांगितले.

पंधरा दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच काल मारहाणीत सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे, याचा तपास राहुरी पोलिस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe