Ahmednagar News : पुढील चार दिवस पावसाचे; या भागात मुसळधार तसेच अतिवृष्टीचा इशारा

Published on -

Ahmednagar News : जिल्ह्यात रविवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांची आता पेरणीची लगबग सुरू होईल. मान्सूनने आपला प्रवास सुरू ठेवला आहे.

रविवारी पुणे, मुंबईसह आणखी काही भाग मान्सूनने व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत मान्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.  मान्सून केरळमध्ये ३० मे रोजी दाखल झाल्यानंतर ६ जून रोजी गोव्याचा उर्वरित भाग, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रात दाखल झाला होता. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये त्याने मजल मारली.

मात्र, मान्सूनची शुक्रवारी प्रगती झाली नव्हती. मात्र, त्यानंतर मान्सूनची प्रगती सुरूच आहे. मान्सूनच्या प्रगतीची उत्तरसीमा ठाणे, अहमदनगर, बीड, निझामाबाद, सुकमा, मलकनगिरी, विजयानगरम, इस्लामपूर (पं. बंगाल) येथून जात आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मध्य अरबी समुद्र, मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह तेलंगणामध्ये मान्सूनची प्रगती शक्य आहे. दरम्यान, रविवारी राज्याच्या विविध भागांत पाऊस पडला.

सोलापूर, मुंबई, सांताक्रुझ, छत्रपती संभाजीनगर, बीडसह काही भागांत पावसाची नोंद झाली. १० ते १३ जून दरम्यान, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News