येत्या सोमवारी मनोज जरांगे नगरमध्ये ! कसा असेल मार्ग? किती किलोमीटर असेल रॅली? सुरवात कोठून होणार? वाचा सविस्तर..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. उपोषण, सभा, रॅली आदींमार्फत ते लढा देत आहेत. सध्या ते महाराष्ट्रभर शांतता रॅली काढत आहेत. सर्वच जिल्ह्यात त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
manoj jarange

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु आहे. उपोषण, सभा, रॅली आदींमार्फत ते लढा देत आहेत. सध्या ते महाराष्ट्रभर शांतता रॅली काढत आहेत. सर्वच जिल्ह्यात त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.

आता येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील नगरमध्ये येत असून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. केडगाव येथे नगर शहरात रॅलीचे स्वागत होणार आहे.

तेथून माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरात रॅली काढण्यात येणार आहे. शहरात सुमारे साडेसहा किमीचे अंतर कापत चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे.

दरम्यान, सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहेत. नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून लाखो समाजबांधव शहराच्या रॅलीत सहभागी होणार आहेत.

चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी
जरांगे पाटील पुण्याहून नगरकडे येणार आहेत. नगरच्या अखंड समाजाच्या वतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल.

तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील. नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल.

असा आहे शहरातील रॅली मार्ग
केडगाव येथे स्वागत-कायनेटिक चौक-सक्कर चौक – माळीवाडा बसस्थानक मार्केट यार्ड चौक – माळीवाडा वेस- पंचपीर चावडी आशा टॉकीज चौक-माणिक चौक-कापड बाजार तेलिसुंट- चितळे रोड मार्गे चौपाटी कारंजा (समारोप)

अशी असेल पार्किंग व्यवस्था
केडगाव येथे नेमाने इस्टेट, कल्याण रस्त्यावर फटाका मार्केट भरणारी जागा, शहरात क्लेरा ब्रूस मैदान न्यू आर्टस् कॉलेज,

सावेडीत सारडा कॉलेज अशा विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यासह अनेक ठिकाणी शहरात येणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागांवर पार्किंग असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe